आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोराला पकडण्यासाठी दाम्प्त्याने लढवली शक्कल; पोलिसही झाले हैराण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली -  दिल्लीच्या मधुविहार भागात चोरी होता होता अर्ध्या रात्री आलेल्या चोराने खोलीतील कपाड तोडून हाथ साफ करत होता. तेवढ्यात घरातील लोकांची झोप उघडल्याने होणार अनर्थ टळला. त्यांनी भामट्याला खोलीत डांबून बाहेरून दरवाजा बंद केला. त्यानंतर चोराने मोठ्याने गोंधळ घातला होता. तसेच घरातील दाम्प्त्याला जीवे मारण्याची धमकी देत होता. दोन तासाच्या गोंधळानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. राशिद अली आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आशिष बिष्ट यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  

 

आशीष दिल्ली येथील मधूविहार भागात एका किरायाच्या घरात राहतात. ते एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. गुरूवारी रात्री 12.30 वाजता त्यांचा वाढदिवस साजरा करून झोपी गेले होते. कोणीतरी असल्याची चाहूल लागल्यामुळे त्यांना 3.00 वाजता त्यांना जाग आली. त्यांनी दुसऱ्या खिडकीतून बघितले असता तेथे एक चोर कपाटाचे कुलूप तोडून सामान काढत होता.  त्यांनी खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यानंतर चोराने दरवाजा उघडण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकून घरमालक रामदत्त देखील तेथे आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना सुचना दिली. दरम्यान चोराने शिवीगाळ करत गोळी मारण्याची धमकी दिली. 

 

पळून जाण्याच्या प्रयत्नात झाला जखमी
आरोपीने फरार होण्यासाठी लोखंडाच्या रॉडने खिडकीची ग्रिल तोडण्याच्या प्रयत्नात त्याच्या हाताला जखम झाली आहे. जवळपास अर्ध्या तासानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी पिस्तुलाच्या आधारावर दरवाजा उघडला आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्टल आणि काडतूस व्यतिरिक्त एका महिलेची पर्स ताब्यात घेतली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...