आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या 47 वे सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांनी शपथ दिली. माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी केंद्राला पत्र पाठवून शरद बोबडे यांचे नाव सुचवले होते. शरद बोबडे यांचा कार्यकाळ 17 महिने असणार आहे. 23 एप्रिल 2021 मध्ये ते निवृत्त होत आहेत.
न्यायमूर्ती बोबडेंचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजी नागपुरमध्ये झाला होता. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. यानंतर 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली होीत. 2012 मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांन पदभार सांभाळला होता. यानंतर 2013 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात त्यांची नियुक्ती करण्यात आली. माजी सरन्यायाधीश गोगोई यांच्याविरूद्ध लैंगिक छळाच्या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत न्यायमूर्ती बोबडे सहभागी होते.
न्यायमूर्ती बोबडे यांना बाईक चालविण्याची आवड
न्यायमूर्ती शरद बोबडे आनंदी आणि मृदुभाषी असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यांना बाइक राइडिंग आणि कुत्र्यांची आवड आहे. तसेच त्यांना रिकाम्या वेळात पुस्तके वाचणे आवडते. ते घरी साधेपणाने राहतात. त्यांचा हा साधेपणा प्रत्येक ठिकामा पाहायला मिळतो.
माजी सरन्यायाधीश गोगोई यांचा 13 महिने आणि 15 दिवस होता कार्यकाळ
माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी 3 ऑक्टोबर 2018 रोजी 46 वे सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ 13 महिने 15 दिवसांचा होता. गोगाई यांनी आपल्या कार्यकाळात कामाख्या देवीच्या दर्शनासाठी दोन वेळा गेले होते. त्यांनी अयोध्या विवादावर ऐतिहासिक निर्णय दिला. तसेच राफेल प्रकरणातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. यासोबत गोगाई यांनी सरन्याधीशांना आरटीआयच्या कक्षेत दाखल केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.