आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Delhi: Scuffle Between Police Personnel And Lawyers At Tis Hazari Court News And Updates

दिल्लीतील न्यायालयात वकील आणि पोलिसांमध्ये बाचाबाची नंतर जाळपोळ, फायरिंगमध्ये एक वकील जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीतील एका स्थानिक न्यायालयात आज(शनिवार) वकील आणि पोलिसांदरम्यान हिंसक हाणामारी झाली. या दरम्यान झालेल्या फायरिंग मध्ये एक वकील जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोर्टाच्या पार्किंगमध्ये वकीलाच्या कारला पोलिसांच्या व्हॅनने टक्कर मारल्यानंतर वाद उफाळून आला. त्यानंतर वकिलांच्या ग्रुपमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यावेळी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी फायरिंग केली. यावेळी नाराज वकिलांना पोलिसांची गाडी आगीच्या हवाली केली. या सर्व घटनेनंतर परिसरात मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला आहे.बार असोसिएशनचे सदस्य जय बिस्वालने सांगितले की, पोलिसांच्या एका गाडीने न्यायालयात येत असताना वकिलाच्या एका गाडीला टक्कर मारली. त्यानंतर झालेल्या वादात 6 पोलिसांनी त्या वकिलाला बेदम मारहाण केली. त्यानंतर एसएचओ आणि स्थानिक पोलिस घटनास्थळावर आले, पण त्यांना आत जाऊ दिले नाही. त्यानतंर 6 न्यायाधिश प्रकरण पाहण्यासाठी गेले, पण त्यांनाही आत जाऊ दिले नाही. त्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी फायरिंग केले.

जखमी वकिलाला रुग्णालयात नेले

या तीस हजारी कोर्टात काम करत असलेले वकील कदम खर्बने सांगितले की, पोलिस आमच्या सुरक्षेसाठी असते, पण त्यांनी आज वकिलांवर गोळीबार केला. गोळी लागल्यानंतर जखमी वकील विजय वर्माला सेंट स्टीफन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...