आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक एक नवं नाटक रंगभूमीवर घेऊन येत आहे. या नाटकाचा एक गमतीशीर टिझर काही दिवसांपूर्वी प्रसाद ओकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या टीझरमध्ये प्रसाद ओक प्रशांत दामले यांना भूमिका नाकारताना दिसतोय. तू 22 वर्षांचा वाटतोस त्यामुळे तू नकोच असं प्रसाद ओक म्हणतो आणि त्यावर प्रशांत दामले म्हणतात ‘तू म्हणशील तसं’. 'तू म्हणशील तसं...' हेच प्रसादच्या नाटकाचं नाव असून अभिनेते प्रशांत दामले या नाटकात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
हा टीझर रिलीज करताना प्रसाद आणि प्रशांत यांनी नाटकातील इतर कलाकारांची नावं आणि हे नाटक कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार याबाबत गुप्तता बाळगली होती. पण आता प्रसाद ओक यांनी नाटकातील हिरो-हिरोईन मिळाले असल्याचे सांगितले आहे. प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन टिझर पोस्ट करुन हिरो-हिरोईनच्या नावाचा उलगडा केला आहे.
संकर्षण क-हाडे आणि भक्ती देसाई यांच्या भूमिका...
या नाटकात अभिनेता संकर्षण क-हाडे हा हिरोच्या भूमिकेत असून भक्ती देसाई हिरोईन आहे. संकर्षण क-हाडेला आपण छोट्या पडद्यावर आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना बघतोय. तर भक्ती देसाईसुद्धा मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध नाव आहे. तिनेही काही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. माझ्या नव-याची बायको या मालिकेत सौमित्रची भूमिका वठवणारा अभिनेता अद्वैत दादकरची भक्ती पत्नी आहे.
प्रसाद ओक हे नाटक दिग्दर्शित करत असून संकर्षण क-हाडेने नाटकाचा लेखक आहे. येत्या 5 डिसेंबरपासून हे नाटक रंगभूमीवर दाखल होतंय. प्रेक्षक आता ‘तु म्हणशील तसं’ या आगामी नाटकाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.