आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकदा चार्ज केल्यावर 800 किमी धावेल हे इलेक्ट्रिक वाहन, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीपासून मिळणार सुटका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका - शास्त्रज्ञांनी अशा अनेक वस्तू निर्मीत करण्याचा दावा केला आहे की ज्यामुळे विजेवर चालणाऱ्या वाहनांना एकदा चार्ज केल्यानंतर ते वाहन 800 किमीपर्यंतचे अंतर कापू शकतात. अमेरिकेतील इलिनोइस विद्यापीठातील संशोधकांचे म्हणणे आहे की, लिथियम-एअर बॅटरी सध्याच्या वापरात असलेल्या लिथियम-आयन बॅटरीपेक्षा 10 पटीने अधिक ऊर्जा संग्रहित करू शकते आणि वजनाने हलकी देखील आहे. पण सध्या तरी प्रायोगिक स्वरूपात बॅटरी तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

 

संशोधकांचे म्हणणे आहे की, लिथियम-एअर बॅटरी अधिक प्रभावशाली आहे आणि टु डी वस्तूंपासून निर्मित झालेल्या कॅटालिस्टला समावून घेण्यसोबतच जास्त ऊर्जा उत्पन्न करते. ही उत्प्रेरक बॅटरीमध्ये होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेची गती वाढवते आणि ज्या पदार्थापासून हे उत्प्रेरक तयार झाले आहेत. त्यांच्या आधारे ऊर्जेला संग्रहित करण्याचे तसेच ऊर्जा उपलब्ध करण्याच्या बॅटरीच्या क्षमतेला महत्त्वपूर्णपणे वाढण्यास मदत करू शकते. 

 

या संशोधना दरम्यान उत्प्रेरक रूपात काम करणाऱ्या अनेक 2 डी वस्तूंचे संशोधन करण्यात आले. हे संशोधन 'एडवांस्ड मटेरिअल्स' या पत्रिकेत प्रकाशित झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...