आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New Launch:नवा लक्झरी लूक, जास्त स्पेस आणि अनेक हायटेक फिचर्ससह उद्या जगभरात लाँच होणार Hyundai ची नवी कार, 20 पेक्षा जास्त मायलेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅटो डेस्क - ह्युंडईची नवी सँट्रो कार मंगळवारी 9 ऑक्टोबरला लाँच होत आहे. या कारचे प्रि-बुकींग 10 ऑक्टोबरपासून आणि विक्री 23 ऑक्टोबरपासून होईल. भारतात त्याचे ऑफिशियल लाँचिंग 23 ऑक्टोबरलाच होईल. लाँचिंगपूर्वीच कारचे इंटेरियर आणि मॉडेलचे फोटो लीक झाले आहेत. दरम्यान एका अॅटोमोबाइल वेबसाइटच्या माहितीनुसार याची किंमत 3.7 लाखांपासून सुरू होईल. मात्र अद्याप कंपनीने याचा खुलासा केलेला नाही. 


मारुती आणि टाटाला देणार टक्कर 
असे म्हटले जात आहे की, न्यू सँट्रोची दिल्ली एक्स-शोरूम प्राइज 3.7 लाख असेल. त्यामुळे ही कार मारुती सिलेरियो आणि टाटा टियागोला टक्कर देऊ शकते. सिलेरियोची एक्स शोरूम प्राइज 4.21 ते 5.4 लाख दरम्यान आणि टियागोची प्राइज 3.4 ते 6.0 लाख रुपयांदरम्यान आहे. सँट्रोचे टॉप मॉडेल 5.4 लाखांच्या आसपास असेल. म्हणजे सँट्रो थेट या दोन गाड्यांना टक्कर देईल. 


असे आहेत न्यू सँट्रोचे फिचर्स 
> न्यू सेंट्रोमध्ये जास्त स्पेस असलेले केबीन दिसत आहे. 
> 7-इंच टचस्क्रीन अॅपल कारप्ले इन्फोटेनमेंट सिस्टीम अँड्रॉइड सपोर्टसह दिले आहे. 
> क्लायमेट कंट्रोल सिस्टीमसह रिव्हर्स कॅमेराही दिला आहे. 
> यात मॅन्युअल गीअरबॉक्स दिलेला आहे. त्याच्याजवळ काही बटनही आहेत. 


न्यू लूक, न्यू ग्रिल
> ह्युंडईच्या या कारमध्ये केस्केडिंग ग्रिल दिले आहे. त्याचा लूक स्टायलिश दिसत आहे. 
> ग्रिल फ्रंट बंपरमध्ये पूर्णपणे फिक्स आहे आणि ते ब्लॅक ऑरेंज कॉम्बिनेशनमध्ये आहे. 
> यात ड्युएल फ्रंट एअरबॅग्ज आणि ABS स्टँडर्डही भेटू शकते. 

इंजिन, मायलेज आणि किंमत 
> न्यू सँट्रोमध्ये 1.1 लीटरचे 3 सिलिंडर पेट्रोल इंजीन असेल. ते 5 मॅन्युअल स्पीड गीअरबॉक्ससह येईल. 
> कारचा मायलेज 20.1kmpl असेल. याचे अॅटोमॅटिक ट्रान्समिशनही लाँच होण्याची शक्यता आहे. 
> मीडिया रिपोर्ट्सनुसार ह्युंडईची नवी सँट्रो एंट्री लेव्हल मॉडेलची किंमत 3.5 लाखांच्या आसपास असू शकते. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, न्यू सँट्रोचे PHOTOS.. 

बातम्या आणखी आहेत...