आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा; विराटच राहणार कॅप्टन, राहुल चहरसह नवदीप सैनी नवीन चेहरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट टीमची रविवारी घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. यामध्ये विराट कोहलीला कर्णधार आणि रोहित शर्माला उप-कर्णधार करण्यात आले आहे. महेंद्र सिंह धोनी आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. 


अशी आहे नवीन टीम
टेस्ट टीम- मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, आर अश्विन, आर जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहंमद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव.

वनडे टीम- विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडेय, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहंमद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी

टी-20 टीम- विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडेय, ऋषभ पंत, क्रुणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चाहर आणि नवदीप सैनी

 

असा आहे वेळापत्रक... 

टी-20 सिरीज
पहिला सामना: 3 ऑगस्ट फ्लोरिडाच्या ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडिअममध्ये टर्फ ग्राउंडवर खेळला जाणार
दुसरा सामना: 4 ऑगस्टला याच मैदानावर खेळला जाणार
तिसरा सामना: 6 ऑगस्टला प्रॉविडेंस स्टेडिअम गुयाना (वेस्ट इंडीज) मध्ये खेळला जाणार

 

वनडे सिरीज
पहिला सामना: 8 ऑगस्टला गुयानाच्या प्रॉविडेंस स्टेडिअममध्ये
दुसरा सामना: 11 ऑगस्टला पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) च्या क्वीन्स पार्क ओव्हलमध्ये
तिसरा सामना: 14 ऑगस्टला पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) च्या क्वीन्स पार्क ओव्हलमध्ये


टेस्ट सीरीज
पहिला सामना: 22 ते 26 ऑगस्ट अॅण्टिग्वाच्या सर विवियन रिचर्ड्स स्टेडिअमवर
दुसरा सामना: 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत किंग्सटन जमेकाच्या सबीना पार्कमध्ये

(नोट: सर्वच वनडे आणि टेस्ट सामने भारतीय वेळेनुसार रात्री 7 वाजता तर सर्वच टी-20 सामने रात्री 8 वाजता सुरू होतील.)