आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत: विविध प्रयोग करून साधली प्रगती; जीवामृत तयार करून करपा नियंत्रित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धानोरा- अलिकडे अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्राकडे तरूणांचा कल अाहे. विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना मुलांना डॉक्टर, अभियंता करण्याची जास्त हौस आहे. त्याला कारणही तसे अाहे. शेती करणाऱ्या तरूणांना लग्नासाठी मुली मिळत नाही, मात्र कंपनीत १०-१२ हजार रूपये महिन्यात दिवसरात्र कष्ट उपासणाऱ्याला मुली मिळतात. मात्र, धानोऱ्यातील काही तरूण इंजिनिअरिंगचे शिक्षण घेवून शेतीत रमले अाहे. शेतात केवळ राबत नाही, तर पारंपारिक पद्धत बंद करून नवनवीन प्रयोग करून त्यांनी शेतीत प्रगती साधली अाहे. हे तिन्ही तरूण तरुणांसाठी रोल माॅडेल ठरत अाहेत. त्यांनी केलेले प्रयोग व मेहनत प्रेरणादायी ठरत अाहे. 


या तरुणांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून काळ्या मातीत रमले अाहेत. थाटात जीवन जगण्याच्या पद्धतीला फाटा दिला. गावाकडे येऊन स्वतःची शेती सांभाळली, त्यात पारंपारिक पद्धत बंद नवनवीन प्रयोग करत उत्पादन वाढवले. यात पाण्याची बचत केली. स्वतः जिवामृत तयार केले. सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करत आहेत. 


 


प्रसन्न महाजनने घेतले मक्याचे विक्रमी उत्पादन 
प्रसन्न सतीश महाजन या तरूणाने २०११ मध्ये बीई ऑटोमोबाइल केले. पुण्यातील एका खासगी कंपनीतील नोकरी सोडून घरी असलेल्या शेतीकडे वळला. सन २०१६-१७ मध्ये तीन एकर शेतीत ठिबक सिंचनाद्वारे एकरी ५६ क्विंटल मक्याचे विक्रमी उत्पादन मिळवले. गेल्या दोन वर्षापासुन ठिबक सिंचनवर भर देत शंभर टक्के ठिबक द्वारे पाण्याचे नियोजन तयार केले आहे. पाण्याचे योग्य नियोजन व्हावे यासाठी ठिबक सिंचनावर भर देत संपूर्ण ३० एकरमध्ये ठिबक सिंचनद्वारे पाण्याचे सुक्ष्म नियोजन केले आहे. शेतात त्यांनी शेतात एकही ट्युबवेल न करता फक्त दोन विहिरींवर सर्व शेती ओलिताखाली आणली. पाण्याच्या नियोजनामुळे भर उन्हाळ्यातही मोटारी बंद ठेवाव्या लागतात. जैविक खते, फवारणी, ड्रिपद्वारे पाणी देणे यावर भर दिलेला आहे. 


अनंत पाटील याने तयार केले जीवामृत 
अनंत बाजीराव पाटील याने १९९८ मध्ये बीई केमिकल केले. गुजरातमध्ये दोन वर्ष नोकरी केली. नंतर पुणे येथे काही दिवस मार्केटींग केली. त्यानंतर शेती करीत अाहे. शिक्षण केमिकल इंजिनियरींग असल्यामुळे खतांवर नियंत्रण करण्यास मदत झाली. स्वत: विविध प्रकारचे खते तयार करुन त्याचा वापर शेतात करतात. स्वतः जिवामृत तयार करुन पिकांना देतात. यामध्ये शेण, गुळ, गोमुत्र याचा वापर केलेला आहे. त्यांनी तयार केलेले जिवामृत केळीला करपा या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत झाली. परिसरातील संपूर्ण केळीवर करपा रोगाचे प्रमाण आहे. परंतु पाटील यांनी तयार केलेल्या जिवामृत दिल्याने केळीवरील करपा नियंत्रणाचे आणला आहे. तसेच वर्मी वॉश छोटेखानी प्रकल्प तयार करुन यापासून तयार झालेल्या अर्काची फवारणी करता येते. 


भूषण पाटील याने आंतरपीक घेऊन घेतला नफा 
भूषण रमेश पाटील याने २०१४ मध्ये बीई कॉम्प्युटर केले. पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडून सन २०१५ पासुन घरची शेती करायला सुरुवात केली. जुनी पारंपरिक केळीची लागवड ५ बाय ५ ही बंद केली आणि नवीन ७ बाय ४ या अंतरावर केळीची लागवड करुन उत्पन्नात भर पडली. यात पाण्याचीही बचत करता आली. तसेच केळीमधील अंतर जास्त असल्याने गिलके, कारले, चवळी ही आंतरपीके घेऊन उत्पादनात भर घातली. स्वतः जिवामृत तयार केले, यामुळे जास्त होणारा रासायनिक खतांचा वापर कमी झाला. सोबत सेंद्रिय खतांचाही वापर सुरु आहे. गाल्यातील फरकामुळे अडीच एकर कांदेबागात सहा लाख रुपयांचे उत्पन्न २०१७-१८ मध्ये झाले आहे.भविष्यात केळी प्रक्रीया उद्योगासाठी सध्या प्रयत्न सुरु आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...