आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गॅजेट डेस्क : चीनमध्ये शाळेतील मुलांची अऩुपस्थिती लक्षात घेऊन एक नवीन पर्याय शोधण्यात आला आहे. चीनच्या अनेक शाळांमध्ये मुले क्लास बंक करतात. हे थांबविण्यासाठी येथील 10 शाळा मुलांसाठी इंटेलिजेंट युनिफॉर्म वापरणार आहेत. या युनिफॉर्मच्या मदतीने मुलांची लोकेशन ट्रॅक करता करता येणार आहे. चीनच्या गुआन्यु टेक्नॉलॉजी कंपनीने हा युनिफॉर्म विकसित केला आहे. येथील गुईझोऊ आणि गुआंक्शी झुआंग प्रांतातील शाळांमध्ये़ याचा वापर करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे काम करेल युनिफॉर्म, पालक-शिक्षकांना मिळणार लोकेशनची माहिती
या इंटेलिजेंट युनिफॉर्मच्या खांद्यावर दोन चिप लावण्यात आल्या आहेत. या चिप्स दरवेळी मुलांच्या लोकेशनला ट्रॅक करण्याचे काम करणार आहे.
हा युनिफॉर्म परिधान करून मुलाने शाळेत प्रवेश करताच त्याच्या येण्याची वेळ आणि तारिख रेकॉर्ड होणार आहे आणि पालकांच्या तसेच शिक्षकांच्या मोबाइलवर अॅपवर याची माहिती मिळलणार आहे.
यासोबतच शाळेच्या प्रवेशद्वारावर फेशियल रेकग्निशनला सपोर्ट करणारे विशेषप्रकारचे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. जेणेकरून युनिफॉर्म योग्य विद्यार्थ्याने परिधान केला आहे की, त्याच्याऐवजी दुसरा कोणी युनिफॉर्म परिधान करून आला आहे हे समजणार आहे.
युनिफॉर्ममध्ये दुसरा मुलगा आल्यास अलार्म वाजेल. इतकेच नाही तर, जर एखादा मुलाने शाळा सुटण्यापूर्वीच बाहेर जाण्याच प्रयत्न केला तर तेव्हा देखील हा अलार्म वाजणार आहे.
एखादा मुलगा वर्गात झोपत असले तर त्याचा अलार्म वाजण्यास सुरुवात होईल. मुलांच्या लोकेशन ट्रॅक करण्याबरोबरच त्यांच्या खर्चावरही पालकांना नियंत्रण करण्यास या युनिफॉर्मचा उपयोग होणार आहे. कंपनीच्या मते, पालक या युनिफॉर्मच्या मदतीने आपल्या मुलांच्या खर्चाची मर्यादा निश्चित करू शकता.
या युनिफॉर्मला 500 वेळा धुता येणार
गुआन्यु टेक्नॉलॉजी कंपनीच्या मते, या इंटेलिजेंट युनिफॉर्मला 500 वेळा धूता येणार आहे. इतकेच नाही तर 150 डिग्री सेल्सियस पर्यंतचे तापमान सहन करण्याची या युनिफॉर्मची क्षमता आहे. या युनिफॉर्मचा उद्देश मुलांना ट्रॅक करण्याचा नाही आणि कंपनी प्रत्येकवेळी मुलांची लोकेशन ट्रॅक करत नसल्याचे कंपनीने सांगितले.
मुलगा हरवला तरी सापडणार
गुईझोऊ येथील रेनहुआई शाळेचे मुख्याध्यापर लिन झोंगवु यांनी सांगितले की, "मुले जेव्हा घरी जातील तेव्हा त्यांची लोकेशन ट्रॅक करण्यात येणार नाही. पण मुलगा जेव्हा क्लास बंक करेल किंवा तो हरवेल तेव्हा त्याच्या लोकेशनला ट्रॅक करण्यात येणार आहे."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.