आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाचा नवा नकाशा, पीओके केंद्रशासित प्रदेश झालेल्या जम्मू-काश्मीरचा भाग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन झाल्यानंतर गृह मंत्रालयाने शनिवारी देशाचा नवा नकाशा जारी केला. यात पाकव्याप्त काश्मीर (पीओके) नवा केंद्रशासित प्रदेश झालेल्या जम्मू-काश्मीरचा भाग तर गिलगिट व बाल्टिस्तान लडाखचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. नकाशात पीओकेची राजधानी मुजफ्फराबादही भारताच्या भौगोलिक सीमेत दाखवण्यात आले आहे.

सध्या पीओके आणि गिलगिट-बाल्टिस्तान पाकच्या ताब्यात आहे. नव्या नकाशानुसार, जम्मू-काश्मीरपेक्षा लडाखचे क्षेत्रफळ मोठे आहे. मात्र, लडाखमध्ये कारगिल व लेह हे दोनच जिल्हे आहेत. पूर्वीच्या जम्मू-काश्मीर राज्यातील उर्वरित सर्व जिल्हे केंद्रशासित जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये २८ जिल्हे असून हा नकाशा सर्व्हेअर जनरल ऑफ इंडियाच्या वतीने तयार करण्यात आला आहे.

३१ ऑक्टोबरपासून देशात एक राज्य कमी होऊन दोन केंद्रशासित प्रदेश वाढले आहेत. त्यानुसार देशात आता २८ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेश आहेत. जम्मू-काश्मीर पुनर्रचनेसंबंधीच्या आदेशात केंद्रशासित प्रदेश झालेल्या लडाखमध्ये गिलगिट, गिलगिट वजारत, चिल्हास व आदिवासी भागाचा समावेश झाला आहे.
 

१९४७ मध्ये होते १४ जिल्हे
पूर्वीच्या जम्मू-काश्मीरमध्ये १९४७ मध्ये १४ जिल्हे होते. राज्य सरकारने पुनर्रचना करत ही संख्या २८ वर नेली. 

बातम्या आणखी आहेत...