आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाचा भूतकाळ ठरणार दुसऱ्याचा भविष्यकाळ... एम एक्स ओरिजिनल 'समांतर' वेबसेरीजचा ट्रेलर प्रदर्शित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठीसह तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणारी पहिली मराठी वेबसिरीज
  • ...यामुळे स्वप्नील जोशीने घेतला 'समांतर' करण्याचा निर्णय
  • समांतर 13 मार्च रोजी एम.एक्स.प्लेयरवर होतीये प्रदर्शित

बॉलिवूड डेस्क - आपल नशीब आपण घडवत असतो या गोष्टीवर अनेकांचा विश्वास असतो मात्र, खरंच आपण आपलं नशीब जगतोय का? जे नशीब घेऊन आपण जन्माला आलो आहोत ते आपण जगत आहोत का? हा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून राहत नाही! कोणीतरी जगलेलं आयुष्य जर तुमचे भविष्य ठरणार असेल, तर तुम्हाला त्या व्यक्तीमुळे तुमचं भविष्य जाणून घेता येईल ना! याच आशयाला अनुसरून एम एक्स प्लेअर घेऊन येत आहे एक चित्तथरारक कथा वेबसिरीज च्या रूपात. एम एक्स ओरिजिनलची निर्मिती असलेली 'समांतर', या वेबसिरीज च्या रूपाने उलगडणार आहे कुमार महाजन या सामान्य माणसाचा आयुष्याचा रोमांचकारी प्रवास. कुमार महाजनचा या सामान्य माणसाचं आयुष्य बदलत ज्यावेळी त्याला समजत सुदर्शन चक्रपाणी या व्यक्तीचा भूतकाळ हा त्याचा भविष्यकाळ ठरणार आहे. 'कुमार महाजन' साकारत असलेला स्वप्नील जोशी समांतरच्या निमित्ताने वेब दुनियेत पदार्पण करत आहे. या वेबसिरीज मध्ये स्वप्नील जोशी सामान्य माणसाचे धकाधकीचे जीवन जगताना दिसणार आहे, कुटुंबाच्या दैनंदिन गरज भागवत भागवत नाकी नऊ येत असताना कुमारला नोकरीवरून काढले जाते. तेजस्विनी पंडित ही गुणी अभिनेत्री स्वप्नील जोशींच्या पत्नीची भूमिका साकारत असून 9 भागांची ही वेबसिरीज सतिश राजवाडे यांनी दिग्दर्शित केली आहे.

13 मार्च रोजी होणार प्रदर्शित 

ही समांतरची कथा ही बहुसंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहचावी तसेच तिला भाषेचे बंधन नसावं म्हणून ही वेबसिरीज मराठी सोबतच हिंद, तामिळ आणि तेलगू या भाषेत सुद्धा प्रदर्शित होणार आहे. मराठी सोबत इतर 3 भाषेत 'समांतर' एकाचवेळी 13 मार्च रोजी एम.एक्स.प्लेयर प्रदर्शित होणार आहे.

वेबच्या माध्यमातून मराठी साहित्य आणि कलाकृतींना अजून एक माध्यम मिळाले

या वेबसिरीजविषयी दिग्दर्शक सतिश राजवाडे सांगतात "मराठी साहित्य आणि कलाकृतींना अजून एक माध्यम मिळालं आहे आणि ते म्हणजे वेब, सुहास शिरवळकरांची ही कथा साकारताना मला फार आनंद होतोय. ही कथा वेबसिरीजच्या निमित्ताने तसेच स्वप्नील आणि तेजस्विनीमुळे एका वेगळ्या उंचीवर जाईल हे नक्कीच."...त्यामुळे स्वप्नील जोशीने घेतला 'समांतर' करण्याचा निर्णय


कुमार महाजन साकारत असलेला स्वप्नील त्याच्या भूमिकेविषयी सांगतो, "माझा विश्वास हा नेहमीच कठोर परिश्रमांवर आहे, मात्र नशिबाचा विचार करणारे, ग्रह तारे सरळ आहेत का, हीच योग्य वेळ आहे का? असे प्रश्न पडणाऱ्यांविषयी मला नेहमीच कुतूहल राहिले आहे आणि त्यामुळेच मी 'समांतर' करण्याचा निर्णय घेतला"

मराठीसह तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणारी पहिली मराठी वेबसिरीज


तेजस्विनी पंडित 'समांतर' विषयी सांगते " समांतरसाठी मी खरंच फार उत्सुक आहे कारण ही पहिली मराठी वेबसिरीज आहे जी मराठी व्यतिरिक्त 3 इतर भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. वेब हे माध्यम आम्हा कलाकारांना एक चांगली संधी उपलब्ध करून देत ज्यात आम्हाला खूप काही शिकायला मिळत आहे. ही वेबसिरीज प्रत्येकाला शेवट पर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी होईल.

 

बातम्या आणखी आहेत...