Home | Bollywood | Marathi Cinekatta | New marathi movie talli

अतरंगी व्यक्तीची गोष्ट सांगणारा 'टल्ली' 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 14, 2019, 05:30 PM IST

गोळपकर हे यशस्वी उद्योजक असून संगीत आणि चित्रपटांची त्यांना आवड आहे.

  • New marathi movie talli

    झेब्रा एंटरटेन्मेंट' या निर्मिती संस्थेच्या 'टल्ली' या आगामी मराठी चित्रपटाचा 'मुहूर्त' चित्रपट महामंडळाचे' अध्यक्ष मेघराज राजेभोसले व अभिनेते सुशांत शेलार यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. चित्रपट निर्माते एम के धुमाळ, सतीश फुगे, दिग्दर्शक रामकुमार शेडगे, अभिनेते प्रशांत तपस्वी, अनिल नगरकर, किरण रोंगे, विष्णू घोरपडे, राजेश कोरे, एस के पाटील, योगेश कोळी, शिवा भाऊ पासलकर, रविंद्र बेंंडभर या चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली होती. यामध्ये नामांकित कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, निर्माते यांचा समावेश होता.

    या चित्रपटाचे निर्माते संजय गोळपकर असून या अगोदर त्यांनी 'चल चले' हा हिंदी चित्रपट आणि 'बेधुंद' हा मराठी चित्रपट तसेच 'उतरंड' या आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लघुपटाची निर्मिती त्यांनी केली आहे. गोळपकर हे यशस्वी उद्योजक असून संगीत आणि चित्रपटांची त्यांना आवड आहे. चांगल्या पद्धतीने या चित्रपटाची निर्मिती होईल. असे मतं गोळपकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

    या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संगीत गणेश - सुरेश ही तरुण जोडी करणार असून या अगोदर या जोडीने 'उतरंड' या लघुपटाद्वारे त्यांनी नाव लौकीक मिळवले आहे. तसेच या लघुपटाला अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. गणेश - सुरेश यांचा हा दिग्दर्शनाचा पहिला चित्रपट आहे. मराठीतील नावजलेले कलाकार या चित्रपटात काम करणार असून लवकरच कलाकारांची नावे आम्ही जाहीर करून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. असे त्यांनी या प्रसंगी सांगितले.

Trending