आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरपूरजवळ लॉजमध्ये नवविवाहितेचा प्रियकराकडून खून, 23 मार्चला झाला होता विवाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर- शिरपुरजवळ आमोदे येथील संगीता लॉज येथे एका नवविवाहीतेचा खून झाला. रेणुका धनगर (22, रा.जातोडा ता.शिरपूर) असे मृत तरुणीचे नाव आहे. सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास रेणुकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. रेणुकाचा गेल्या 23 मार्चला विवाह झाला होता.

 

मिळालेली माहिती अशी की, रेणुका धनगर ही तरुणी सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता संशयित आरोपी नरेंद्र एकनाथ भदाने उर्फ पप्पू शेटे याच्यासोबत लॉजमध्ये आली होती. पप्पू शेटे याने सकाळी साडे दहा वाजता रेणुकाच्या आईला फोन केला होता. 'तुम्ही आमचे लग्न होऊ दिले नाही, मी रेणुकाची हत्या केली असून स्वत:ही आत्महत्या करीत आहे.', असे पप्पूने रेणुकाच्या आईला सांगितले. नंतर तातडीने रेणुकाचे आई-वडील घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

 

प्रेमप्रकरणातून रेणुकाचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी पप्पू शेटे फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो..