Home | Business | Industries | New model of Tejas Express in Indian railway

विमानातील सुविधांपेक्षाही अधिक लग्झरी सुविधा असणाऱ्या तेजस एक्सप्रेसचे नवे मॉडेल; लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 02:37 PM IST

हेडरेस्ट आणि फुटरेस्ट यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या लग्झरी सुविधा

 • New model of Tejas Express in Indian railway

  नवी दिल्ली- भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी रेल्वेच्या डब्ब्यात अनेक सुविधा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एक्सप्रेसमध्ये सर्वात आरामदायी एक्सप्रेस अशी ओळख असलेली तेजस एक्सप्रेस आता लवकरच नव्या रुपाने प्रवाशांच्या सेवेत हजर करणार आहे. या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांसाठी अनेक लग्झरी सुविधा देण्यात आल्या आहे. 2017 मध्ये ही एक्सप्रेस मुंबई ते गोवा या मार्गासाठी सुरू करण्यात आली होती.

  एक्झीकेटीव्ह क्लासमध्ये बसतील 56 प्रवासी

  > जुन्या तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी सीट्स आरामदायी होते परंतु नव्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना आरामदायी सिट्ससह अनेक सुविधा देण्यात आल्या आहे. या ट्रेनमध्ये आता 78 प्रवाशांना बसण्याची व्यवस्था असून एक्झीकेटीव्ह क्लासमध्ये 56 प्रवाशांना बसण्याची सुविधा असणार आहे. या ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सिट्सला हेडरेस्ट आणि फुटरेस्ट, प्रवाशांनाच्या मनोरंजनासाठी एलसीडी स्क्रिन या सुविधादेखील असणार आहे. याव्यतिरिक्त प्रवाशाच्या सिट्सशेजारी एक बटन असेल ते दाबल्यानंतर प्रवासी कर्मचाऱ्याकडे आपल्या गरजेनुसार वस्तूंची मागणी करु शकणार आहे.

  पुढील स्लाइडवर पाहा Photos...

 • New model of Tejas Express in Indian railway
 • New model of Tejas Express in Indian railway

Trending