आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
बरांका(पेरू)- येथील एका तरूणीला रूग्णालयाच्या चुकीमुळे त्रास सहन करावा लागला. तिला हॉस्पिटल स्टाफने चुकीचे बाळ दिले. त्या बाळाचे आयडेंटिटी ब्रासलेट इतर बाळांसोबत मिक्स झाल्यावर तिला संशय आला. त्यानंतर तरूणीने एका प्रायव्हेट क्लीनिकमध्ये डीएनए टेस्ट केल्यावर संशय खरा ठरला. तरूणी म्हणाली, आतापर्यंत ती दुसऱ्याच्या मुलीची सेवा करत होती आणि तिची स्वत:ची मुलगी गायब आहे. आता तरूणी आणि तिचे कुटुंबीय रूग्णालायाच्या बाहेर प्रदर्शन करत आहेत.
अशी झाली अदला-बदली
- बरांकामध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय तरूणीने सांगितले की, तिने फेब्रुवारीमध्ये एका मुलीला जन्म दिला. डिस्चार्ज झाल्यावर घरी गेली, पण हॉस्पीटल स्टॉफने तिला चुकीचे बाळ दिले होते.
- तरूणी सांगितले की, तिच्या मुलीला नर्स आंघोळ घालण्यासाठी घेऊन गेली होती, तेव्हा आयडेंटिटी ब्रासलेट मिक्स झाल्यामुळे असे झाले.
आई आणि मुलीची होई डीएनए टेस्ट
- हेल्थ मिनिस्टरने प्रेस स्टेटमेंटमध्ये सांगितले की, या प्रकरणात आई आणि मुलीची डीएनए टेस्ट केली जाईल. या टेस्टचा पूर्ण खर्च हेल्थ डिपार्टमेंट करेल. त्याशिवाय हॉस्पीटल प्रशासनाकडून याचा तपास केला जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.