आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनात उत्साह कायम राहिल्यास आपण कोणत्याही कामामध्ये यशस्वी होऊ शकतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळी एका राजाकडे अत्यंत शक्तिशाली हत्ती होता. तो हत्ती अनेकवेळा राजासोबत युद्धामध्ये सहभागी झाला होता. हत्ती राजाच्या सर्व गोष्टी ऐकत होता. तो स्वामी भक्त आणि समजूतदार होता. हत्ती वृद्ध झाल्यामुळे राजाने त्याला युद्धामध्ये घेऊन जाणे बंद केले. हत्तीच्या व्यवस्थेत राजाने  कोणतीही कमी ठेवली नव्हती परंतु युद्धामध्ये जाता येत नसल्यामुळे हत्ती उदास राहत होता.


> एके दिवशी हत्ती तलावात पाणी पिण्यासाठी गेला असताना तेथील दलदलमध्ये अडकला. खूप प्रयत्न करूनही त्याला बाहेर येणे जमत नव्हते. हत्ती मोठमोठ्याने ओरडू लागला. राजाच्या सेवकांनी हत्तीचा आवाज ऐकून लगेच त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.


> ही बातमी राजपर्यंत पोहोचली आणि राजा लगेच तलावाजवळ आला. सैनिकांनी खूप प्रयत्न केले परंतु हत्ती बाहेर निघू शकला नाही. त्यानंतर राजाने आपल्या मंत्रीला बोलावले.


> मंत्री त्या हत्तीला चांगल्याप्रकारे ओळखत होता. तो राजाला म्हणाला, महाराज तुम्ही याठिकाणी युद्धावमध्ये वाजवले जाणारे ढोल, नगाडे वाजवण्याचा आदेश द्या. मंत्रीचा सल्ला ऐकून राजाने ढोल वाजवण्याचा आदेश दिला.


> ढोल-नगाड्याचा आवाज ऐकताच हत्ती लगेच उठून उभा राहिला आणि संपूर्ण ताकदीने दलदलीच्या बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करू लागला. काही वेळातच हत्ती दलदलीच्या बाहेर आला. राजा हे पाहून आश्चर्यचकित झाला. हत्ती कसा काय बाहेर आला असा राजाला प्रश्न पडला.


> मंत्रीने राजाला सांगितले की, हत्ती तुमच्यासोबत युद्धामध्ये जात होता. जेव्हापासून तुम्ही हत्तीला युद्धामध्ये घेऊन जाणे बंद केले तेव्हापासून याच्या जीवनात उत्साह नव्हता. दलदलीत अडकल्यानंतर त्याला ढोलचा आवाज ऐकू आला आणि त्याला वाटले की आता पुन्हा युद्धाला जायचे, राजाला माझी आवश्यकता आहे. हा विचार करून त्याचा उत्साह परत आला आणि तो बाहेर पडला.


> कथेची शिकवण अशी आहे की, आपल्या जीवनात उत्साह नसल्यास आपण कोणत्याही कामामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. यामुळे जीवनात उत्साह कायम ठेवा. कधीही स्वतःवर निराशा हावी होऊ देऊ नका.

बातम्या आणखी आहेत...