Home | Khabrein Jara Hat Ke | New mum left carrying own intestines in shower after c section scar burst

सिजेरियन डिलीवरीनंतर महिलेने दिला होता मुलीला जन्म, पाच दिवसांनंतर घडली भयानक घटना

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 14, 2019, 12:24 PM IST

अंघोळ करताना खाली वाकल्यानंतर अचाकन उघडले पोट आणि सर्व पाहून ती घाबरली 

 • मेक्डफ. स्कॉटलँडमध्ये राहणा-या एका महिलेसोबत आई झाल्याच्या पाच दिवसांनंतर एक विचित्र अपघात झाला. अंघोळ करताना तिचे पोट अचानक फाटले आणि तिचे आतडे बाहेर आले. यानंतर तिला एयरलिफ्ट करत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. येथे तिचे प्राण वाचवण्यात आले. काही वर्षांपुर्वी घडलेल्या या घटनेची आठवण निघाल्यावर ही महिला आजही घाबरते. महिलेने एका मुलाखतीत आपला हा भयानक अनुभव शेअर केला.
  खाली वाकल्यानंतर फाटले होते पोट...

 • New mum left carrying own intestines in shower after c section scar burst

  - ही स्टोरी स्कॉटलँडच्या मेक्डफ शहरात राहणा-या मेल ब्रेमनर (38) या महिलेची आहे. ही महिला एका हॉटेलमध्ये वेट्रेसचा जॉब करते. ती डिसेंबर 20122 मध्ये आपल्या पहिल्या बाळाची आई झाली, तेव्हाच ही घटना घडली होती. 
  - महिलेने सिजेरियन डिलीवरीच्या माध्यमातून पहिली मुलगी नादीला जन्म दिला होता. डिलीवरीनंतर महिलेला लवकरच हॉस्पिटमधून सुट्टी मिळाली. पाच दिवसांनंतर महिला आपल्या घराच्या बाथरुममध्ये अंघोळ करत होती, तेव्हा यावेळीच शाम्पू घेण्यासाठी वाकल्यानंतर या महिलेले पोट अचानक फाटले आणि तिचे आतडे बाहेर आले. 
  - यादरम्यान डिलीवरीनंतर दिलेले तिचे पोटाचे टाके उघडले होते. पोट उघडताच महिला खुप घाबरली आणि घाबरतच सोफ्यापर्यंत पोहोचली. तिचा पती एडन जॉनसन (40) तात्काळ आला आणि तिला टॉवेलने कव्हर करुन एंबुलेन्सला फोन केला. 

   

   

   

   

 • New mum left carrying own intestines in shower after c section scar burst

  एयरलिफ्ट करत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले 


  - मेडिकल टीम येताच तिला एयरलिफ्ट करत हॉस्पिटलपर्यंत नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी पुन्हा सर्जरी करुन महिलेच्या बाहेर आलेल्या आतड्या ऑपरेट केल्या. काही दिवसांनंतर ती पुर्णपणे ठीक झाली. या घटनेच्या काही दिवसांनंतर महिलेने आपला फोटो शेअर करत सांगितले की, डॉक्टर सांगतात तेवढी सिजेरियन डिलीवरी सोपी नसते. 
  - महिलेनुसार, 'अपघातानंतर मी बाहेर येऊन बसले होते, आणि पोटातील आतडे माझ्या हातात होते. त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर सर्व काही फिरताना दिसत होती. तो अनुभव खुप भितीदायक होता. मला भयंकर वेदना होत होत्या. मी तिछे बसून विचार करत होती की, देवा माझ्या हातात तर माझ्या आतड्या आहेत.'
  - या घटनेनंतर 8 वर्षांनंतर मेलला तीन मुलं झाले आहेत. यामध्ये नादी 7 वर्षांची झाली आहे. तर एली आणि रोबिनचे वय 4 आणि 3 वर्षे आहे. ती घटना आठवताच ही महिला आजही घाबरते. 

Trending