Home | Khabrein Jara Hat Ke | New parents' shock as baby's tiny 'bruise' on forehead grows into massive birthmark

मुलीच्या जन्मानंतर डोक्यावर होते बर्थमार्क, डॉक्टरांनी सांगितले की, वेळेनुसार ठीक होईल पण काही दिवसांतच बिघडली परिस्थीती

प्रतिनिधी | Update - Jan 13, 2019, 02:44 PM IST

आई-वडील म्हणाले - त्या दिवशी दुसरे डॉक्टर नसते तर काय झाले असते?

 • New parents' shock as baby's tiny 'bruise' on forehead grows into massive birthmark


  बकिंघमशायर : येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या मुलीच्या डोक्यावर जन्मजातच एक लाल खूण होती. ही खूण कालांतराने मोठी होत गेली आणि एका ब्लिस्टर्स सारखी झाली. अनेक ठिकाणी उपचार घेतल्यानंतरही काही उपयोग झाला नाही. यामुळे दाम्पत्याची झोप उडाली होती. यामुळे मुलाल त्रास तर होत होता पण त्यातून रक्तही येत होते. याचा काही उपचार होऊ शकत नसून ते आपोआप ठीक होईल असे सांगून डॉक्टरांनी हात वर करून घेतले. दाम्पत्याला काहीच सुजत नव्हते की काय करावे. यादरम्यान एका डॉक्टरांनी त्यांना एक सल्ला दिला. यामुळे त्या मुलीचे आयुष्यच बदलून गेले.


  स्ट्रॉबेरी सारखे निशाण घेऊन जन्माला आली होती मुलगी.....

  - ही कथा बकिंघमशायर येथे राहणाऱ्या क्लो लेंबर्ट या मुलीची आहे. या मुलीचा जन्म 2008 मध्ये निश्चीत वेळेच्या आठ आठवडे अगोदर झाला होता. तिच्या जन्मानंतर तिचे पालक मायकल लेंबर्ट आणि जीन यांना खूपच आनंद झाला होता. पण एका गोष्टीने त्यांना परेशान केले होते.

  - क्लोच्या डोक्यावरील उजव्या ठिकाणी एक लाल निशाण होते. याबाबत डॉक्टरांकडे विचारणा केली असता ती एक जन्मखूण असून वेळेनुसार ती ठीक होईल असे सांगण्यात आले.

  - काही दिवसांनंतरची परिस्थीती डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नव्हती. क्लोचा ते निशाण वाढतच होते. स्ट्रॉबेरी प्रमाणे लाल झाल्यानंतर त्यामध्ये पाणी भरत होते.

  - क्लोची जखम अल्सरसारखी झाली होती आणि ती पसरत डोळ्यापर्यंत येऊन ठेपली होती. यामुळे क्लोचे पालक आणखीनच तनावात आले.

  - मुलीची आई जीन यांच्या मते, त्यावेळी क्लोची प्रकृती अत्यंत खराब झाली होती. तिचा बर्थमार्क चांगलाच पसरला होता. इंफेक्शनमुळे त्यातून कधी-कधी रक्तही वाहत होते.

  - या खूणेमुळे मुलीच्या पालकांबरोबरच डॉक्टरही परेशान झाले होते. तर डॉक्टरांचे म्हणणे होते की, याचा उपचार करण्यासाठी कोणतीही उपचार पद्धत उपलब्ध नाही. तसेच हो डाग वेळेसोबत भरून निघेल. अशातच त्या जोडप्याला काय करावे हे समजत नव्हते.


  मग असा झाला चमत्कार आणि मुलीचे आयुष्यच बदलले

  - एकेदिवशी क्लोच्या जखमेतून रक्त वाहू लागले. यानंतर तिचे तिला घेऊन रूग्णालयात गेले आणि येथून मुलीचे आयुष्य बदलले.

  - रूग्णालयात वाट पाहताना तेथून जाणाऱ्या एका डॉक्टरची नजर क्लोवर पडली आणि तिच्या पालकांशी विचारपूस करून त्यांना उपचारासाठी एका नवीन पद्धतीविषयी सांगितले.

  - त्या डॉक्टरने त्यांना उपचारासाठी लंडन येथे जाण्यास सांगितले. त्या उपचाराने क्लो बरी होणार असल्याचा डॉक्टरने दावा देखील केला होता.

  - लंडन येथील रूग्णालयात प्रोप्रानोलोल नावाच्या औषधीने मुलीचा उपचार करण्यात आला. हा नवा उपचार सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच त्याचा परिणाम दिसण्यास सुरुवात झाली. हळूहळू बर्थमार्कचा आकार कमी होत गेला. काही वर्षातच मुलीचा बर्थमार्क नाहीसा झाला. आता तेथे फक्त एखादा अपघात झाल्यानंतर दिसतो तसा डाग आहे.

 • New parents' shock as baby's tiny 'bruise' on forehead grows into massive birthmark
 • New parents' shock as baby's tiny 'bruise' on forehead grows into massive birthmark

Trending