आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Poster Released Of 'Hungama 2' And 'Jawani Jaaneman', Both Films Will Be Released In 2020

'हंगामा 2' आणि 'जवानी जानेमन'चे पोस्टर रिलीज, नवीन वर्षात प्रदर्शित होणार हे दोन्ही चित्रपट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः प्रियदर्शन दिग्दर्शित 'हंगामा 2' या कॉमेडी चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये शिल्पा शेट्टी, मीजन जाफरी आणि प्रणिता सुभाष परेश रावलसोबत दिसत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 14 ऑगस्ट 2020 आहे. 'हंगामा 2' 2003 मध्ये रिलीज झालेल्या प्रियदर्शनच्या 'हंगामा' चित्रपटाचा सिक्वेल आहे. मीजन जाफरी हा अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा आहे. 

पोस्टर शेअर करुन  शिल्पा शेट्टीने लिहिले- आवडत्या कॉमेडीचा भाग झाल्याने मला खूप आनंद झाला. मला इंडस्ट्रीत इंट्रोड्युस करणा-या रतनजीबरोबर पुन्हा काम करण्याची संधी मिळतेय. मी प्रथमच प्रियदर्शनबरोबर काम करत आहे, जे नेहमीच माझ्या बकेट लिस्टमध्ये होते. कन्फ्युजन अनलिमिटेडसाठी तयार रहा.

  • 'जवानी जानेमन'मधील सैफचा लूक रिव्हील

सैफ अली खान आणि कुब्रा सैत यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी 'जवानी जानेमन' या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिव्हील झाले आहे. या पोस्टरमध्ये सैफ हास्य करताना दिसत आहे. त्याचवेळी त्याच्या हातात दारूची बाटली देखील आहे. निर्माता जॅकी भगनानीने हे पोस्टर शेअर करताना लिहिले, 'या मोसमात आधुनिक प्रेमामध्ये आणखी काही रंग भरण्यासाठी जवानी जानेमन 31 जानेवारीला रिलीज होत आहे.'

बातम्या आणखी आहेत...