आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Privacy Code For Children's Online Safety; Social Media Can Protect Them From Cyber Threats While Gaming

मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी नवा प्रायव्हसी कोड; सोशल मीडिया, गेमिंगदरम्यान त्यांना सायबर धोक्यांपासून वाचवता येईल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन : इंग्लंडमध्ये सोशल मीडिया साइट्स किंवा ऑनलाइन गेम खेळणाऱ्या मुलांना सायबर धोक्यांपासून वाचवण्यासाठी नवीन नियम किंवा आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. डेटावर नजर ठेवणाऱ्या माहिती आयुक्तांच्या कार्यालयात मुलांच्या सुरक्षेसाठी ते तयार करण्यात आले आहेत. यात १५ नियम बनवण्यात आले आहेत. नियमांचा भंग केल्यास मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. नुकतेच लंडनमध्ये १४ वर्षांची मुलगी मॉली रसेल हिने ऑनलाइन कंटेट बघून स्वत:वर अत्याचार केले आणि नंतर आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे आई-वडिलांची काळजी वाढवली होती. मॉलीचे वडील इयान रसेल यांनी ऑनलाइन सुरक्षेच्या नव्या नियमांचे स्वागत केले आहे. माहिती आयुक्त एलिझाबेथ डेनहम यांनी सांगितले की, आपण मुलांचे ऑनलाइन संरक्षण केले नाही हे ऐकून भावी पिढी आश्चर्य व्यक्त करेल. नवे नियम बदल घडवून आणतील. त्यांनी सांगितले की, मुलांच्या सुरक्षेसाठी नियम आहेत, हे १५ नियम त्यांचे संरक्षण अजून चांगले करतील. नव्या नियमांना संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. पाच प्रमुख नियम असे आहेत..

स्ट्रीमिंग, इंटरनेट, शिक्षणाशी संबंधित खेळणीही नियमांच्या कक्षेत येतील

कोडमध्ये म्हटले आहे की, ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून अपेक्षा केली जाते की, मुलांच्या गोपनीयतेच्या संरक्षणासाठी त्यांचे पालन करावे. ऑनलाइन सेवांमध्ये ती खेळणीही सामिल आहेत जी इंटरनेट, अॅप्लिकेशन, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ऑनलाइन गेम, शैक्षणिक वेबसाइट्स व स्ट्रीमिंग सेवांशी संबंधित आहेत.

मुलांचे लोकेशन शेअरिंग बाय डिफॉल्ट 'ऑफ' मोडमध्ये असावी

  • मुलांवर लक्ष : ऑनलाइन सेवा मुलांना लक्षात घेऊन बनवल्या जातील.
  • संरक्षण : उत्पादनापर्यंत पोहोचणाऱ्या मुलांचे हक्क-जोखीम मूल्यांकन आवश्यक.
  • वयाची माहिती : युजरचे वय जाणून घेण्यासाठी प्रभावी यंत्रणा बनवावी लागेल.
  • पारदर्शकता : उत्पादनांची गुप्त माहिती संक्षिप्त, प्रमुख आणि स्पष्ट भाषेत असावी.
  • डिफॉल्ट सेटिंग्ज : यात उच्च गुप्तता बाळगा. लोकेशन शेअरिंगचा पर्याय डिफॉल्टरित्या ऑफ ठेवावा लागेल.
बातम्या आणखी आहेत...