आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hyundai ची नवी सँट्रो कार लाँच, स्टार्टिंग प्राइज 3.89 लाख, पेट्रोल-सीएनजी व्हेरिएंटमध्ये होणार उपलब्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - Hyundai ची बहुप्रतिक्षित कार सँट्रोची ग्लोबल लाँचिंग आज झाली. ही कार टॉल बॉय डिझाइनची आहे. कारची स्टार्टिंग प्राइज 3.89 लाख रुपये आहे. ती पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईळ. सँट्रोच्या आधीच्या कारच्या तुलनेत ही नवी कार अधिक मोठी आणि मजबूत आहे. या कारच्या लाँचिंगच्या वेळी बॉलिवूड अॅक्टर शाहरूख खान उपस्थित होता. 

 
23 हजारांहून अधिक बुकींग 
सँट्रो कारची 13 दिवसांमध्ये 23500 युनिटची प्रिबुकींग झाली आहे. Hyundai ने या कारच्या निर्मितीवर 100 मिलियन डॉलर म्हणजे 730 कोटीं खर्च केले आहेत. कार सात एक्सटेरियर कलरमध्ये उपलब्ध असेल. प्रथमच याच इंपेरियल बीज, डायना ग्रीन रंगांचा समावेश करण्यात आला आहे. 
 
सँट्रोची किंमत 

TRIMS PETROL AMT CNG
 d-lite  3,89,900    
Era 4,24,900    
magna-   4,57,900 5,18,900 5,23,900
sportz   4,99,900 5,44,900 5,84,900
Asta  5,45,900     


 

 

बातम्या आणखी आहेत...