आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहतूक नियम मोडाल तर सावधान...;जेवढ्या पावत्या, तेवढा विम्याचा हप्ता अधिक!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पांडेय 

नवी दिल्ली - तुम्ही वाहतूक नियम मोडले आणि त्यापोटी पावत्या (चलान) भरल्या असतील तर  तर भविष्यात तुम्हाला थर्ड पार्टी विम्याचा प्रीमियम थोडा जास्तच भरावा लागेल. भारतातील रस्ते परिवहन मंत्रालय थर्ड पार्टी इन्शुरन्स व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन काटेकोर व्हावे आणि अपघात कमी व्हावेत म्हणून हा उपाय करू पाहत आहे. सध्या इन्शुरन्ससंबंधी डेटा परिवहन मंत्रालयाच्या “वाहन’ सॉफ्टवेअरशी जोडलेला नाही. त्यामुळे इन्शुरन्ससंबंधी माहिती परिवहन विभागाकडे नाही. भविष्यात “वाहन’ व इन्शुरन्स डेटा लिंक केला जाईल. यामुळे चालक वारंवार वाहतूक नियम मोडत असेल तर तो बेजबाबदार ठरवला जाईल. यामुळे अशा चालकांना विम्याचा हप्ता अधिक द्यावा लागेल.

अशी असेल व्यवस्था :


असे चालक गाडीचा विमा काढण्यासाठी गेला तर “वाहन’ नावाचे सॉफ्टवेअर लिंक असल्याने त्यात गाडीची पूर्ण माहिती मिळेल. वाहतूक नियम तोडल्याचे आणि त्यापोटी चलान कितीदा भरले याची माहिती समोर येईल. यानुसार विम्याचा हप्ता आपोआप वाढून येईल. तेलंगणात हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.३३% वाहनांचाच विमा
 
सद्य:स्थितीत भारतात सर्व वाहनांचा विमा बंधनकारक करण्यात आलेला आहे. थर्ड पार्टी विम्याचा प्रीमियम निश्चित अाहे. तरीही ३३% वाहनांचेच थर्ड पार्टी इन्शुरन्स काढले जाते. विमा न काढणाऱ्यांत दुचाकी चालवणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. सध्याचा थर्ड पार्टी प्रीमियम


वाहन  :  रक्कम


> बाइक  :  482
> 1000 सीसी  :  2120
> 1500 सीसीपर्यंत  :  3300
> याहून जास्त सीसी  :  7890