Home | Business | Gadget | New tablets filed for becoming financial adviser to IIFL

आयआयएफएलचा आर्थिक सल्लागार बनण्यासाठी नवीन टॅब्लेट दाखल; देणार १० लाख नाेकऱ्या

वृत्तसंस्था | Update - May 14, 2019, 10:27 AM IST

भारतात काेठेही बसून सर्व वित्तीय सेवांचे व्यवहार याद्वारे करता येतील

  • New tablets filed for becoming financial adviser to IIFL

    औरंगाबाद - इंडिया इन्फोलाइन अर्थात ‘आयआयएफएल’ या सर्वेक्षण आणि सल्लागार कंपनीने स्वतंत्र आर्थिक सल्लागार बनण्यासाठी एनिटाइम एनिव्हेअर (एएए) हा नवीन टॅब्लेट बाजारात उपलब्ध करून दिला आहे. त्याचबराेबर युवकांच्या प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतानाच १० लाख नाेकऱ्यांचे लक्ष्य देण्याचे निश्चित केले आहे. ही ठेव रिफंडेबल असेल. भारतात काेठेही बसून सर्व वित्तीय सेवांचे व्यवहार याद्वारे करता येतील.हे एक प्रोप्रायटरी हार्डवेअर डिव्हाइस, एक टॅब्लेट असून त्यामध्ये प्री-लोडेड सॉफ्टवेअर व डाटा कार्ड आहे. त्यामुळे तुम्हाला शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बातम्या, मते, तज्ज्ञांची शिफारस, कोणत्याही ग्राहकांच्या पोर्टफोलिओवर व सल्लागाराचे एकंदर कमिशन, कामगिरी, ३६०० मत देणारे सॉफ्टवेअर याविषयी तातडीने माहिती उपलब्ध होईल. नव्या सल्लागारांना एनआयएसएम परीक्षांची माहिती मिळावी व सराव व्हावा, यासाठी टॅब्लेटमध्ये ‘लर्न’ मोड्युलही आहे. सल्लागार आयआयएफएलच्या रिसर्च टीमशी तसेच सर्व्हिस सेलशी २४ बाय ७ आणि उत्पादनविषयक तज्ज्ञांशी चॅटद्वारे जोडलेला असतो. कॉल करण्याची व कॉल घेण्याची सोयही आहे.. २५ हजार रुपयांची ठेव तीन महिन्यांमध्ये परत मिळेल. उत्पादन परत केल्यास व पूर्ण रिफंड मागितल्यास कोणतेही स्पष्टीकरण मागितले जाणार नाही. आयआयएफएल होल्डिंग्ज लिमिटेडचे अध्यक्ष निर्मल जैन म्हणाले, या टॅबमध्ये दाेन दशकांहून अधिक कालावधीचा अनुभव केवळ ८ इंच उपकरणामध्ये समावला आहे आणि त्याचा लाभ घेण्यासाठी नव्या पार्टनरना खर्च करावा लागणार नाही. उत्पन्न जसजसे निर्माण होईल तसतसे शेअर केले जाईल.

Trending