आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Good News: नवी टेलिकाॅम पाॅलिसी मंजूर; चार वर्षांत 40 लाख राेजगार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी ‘नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पाॅलिसी २०१८’ (एनडीसीपी) या दूरसंचार क्षेत्रासाठी नवीन धाेरणास मंजुरी दिली. या धाेरणामुळे या क्षेत्रात सुमारे १०० अब्ज डाॅलरची नवीन गुंतवणूक भारतात येऊ शकेल अाणि त्यामुळे २०२२ पर्यंत या क्षेत्रात ४० लाख नवीन नाेकऱ्या निर्माण हाेतील.  तसेच दूरसंचार क्षेत्रात १२ टक्क्यांपर्यंत वाढ हाेणे अपेक्षित अाहे. 

 

नव्या दूरसंचार धाेरणानुसार अाता फाइव्ह जीसारख्या अत्याधुनिक टेक्नाॅलाॅजी व अाॅप्टिकल फायबरचा वापर जास्तीत जास्त वाढून या सेवा अत्यल्प दरात उपलब्ध हाेतील. तसेच हायस्पीड ब्राॅडबँडचा लाभही जास्तीत जास्त युजरना मिळण्यास मदत हाेईल. तब्बल ७.८ लाख काेटी रुपये कर्जाच्या अाेझ्याखाली दबलेल्या दूरसंचार क्षेत्राला पुनरुजीवित करण्यासाठी स्पेक्ट्रम चार्जसारख्या शुल्कांना व्यावहारिक बनवण्याचा प्रस्ताव या धाेरणात अाहे. तसेच ५० मेगाबाइट प्रतिसेकंद स्पीड उपलब्ध करण्याची शिफारसही या धाेरणात अाहे.  दरम्यान, या निर्णयानंतर टेलिकाॅम कंपन्यांच्या शेअरमध्ये १२ टक्के वाढ झाल्याचे दिसून अाले. अारकाॅममध्ये १२.२० %, अायडिया २.५९ %, भारती एअरटेल ०.१९ % वाढ झाली.

 

बातम्या आणखी आहेत...