आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Therapy Is Being Used In The United States To Prevent Bitterness From Spouses Over Dispute Over Money

पैशांशी संबंधित वादामुळे पती-पत्नीत येतेे कटुता, यापासून बचाव करण्यासाठी अमेरिकेत नवीन थेरपीचा वापर वाढला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेलिंडा लुस्कांब पती, पत्नीमध्ये घरी पैशांवरून नेहमी वाद होत असतात. अनेक प्रकरणांमध्ये तर नात्यांमध्ये कटुता येेते. विशेषत: तरुण जोडप्यांमध्ये ही समस्या बघायला मिळते.  या समस्येवर उपाय शोधण्यासाठी अमेरिकेत एक नवीन बाजारपेठ तयार होत आहे. अनेक संस्था व सल्लागार समूहांनी या क्षेत्रात प्रवेश केला आहे.  कन्सास स्टेट युनिव्हर्सिटी, जॉर्जिया युनिव्हर्सिटी, क्रीटन युनिव्हर्सिटीने फायनेंशिअल थेरपीवर ट्रेनिंग प्रोग्राम व ग्रॅज्युएट कोर्स सुरू केेले आहेत. फ्लोरिडा राज्याने याला सामाजिक कार्य डिग्री कोर्सचा भाग बनवले आहे.  २००९ मध्ये स्थापन झालेल्या फायनान्शियल थेरपी असोसिएशनमध्ये  ३०० सदस्य झाले आहेत. ते एका नियतकालिकाचे प्रकाशन करतात. गेल्या वर्षभरात असोसिएशनच्या सदस्य संख्येत ३३ % वाढ झाली आहे. लोकांच्या आयुष्याशी संबंधित प्रकरणांवर अनेक संस्था, सल्लागार समूह कार्यरत आहेत. परंतु आता व्यावसायिकांनी या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ऑनलाइन फायनान्स कंपनी सोफीने वेडिंग प्लॅनरसोबत भागीदारी केली आहे. नॉर्थ वेस्टर्न म्युच्युअलने नॉट कंपनीसोबत भागीदारी केली आहे. प्रसिद्ध विमा कंपनी जॉन हॅनकॉकने जोडप्यांसाठी  ट्वाइन नावाने एक अॅप तयार केले आहे. हे अॅप परिवारातील आर्थिक नियोजनाचा सल्ला देते. हनिड्यू, हनिफी व जेटा या छोट्या कंपन्यांनी क्षेत्रात प्रवेश केला आहे. कुटुंबात आर्थिक विषयांमुळे होणाऱ्या वादामुळे अनेक विद्यापीठांमध्ये अशा तणावाला सामोरे जाण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अमेरिकेतील  ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीच्या कौटुंबिक  जीवन कॉलेजचे सहायक प्राध्यापक जेफ्री ड्यू सांगतात, “पैसे हा वेगळा विषय आहे. ज्यामुळे दांपत्य आणि परिवारात वाद निर्माण होतात.  वास्तविक, पैसा लोकांच्या आयुष्यात विविध भूमिकांमध्ये आहे. काही लोक पैशांना सुरक्षेचे साधन मानतात तर काही लोक मौजमजा करण्यसाठी पैसे गरजेचे समजतात. लैंगिक संबंध, मुलांचे संगोपन यासारख्या विषयांवर लोक तज्ज्ञांचा सल्ला घेतात, मात्र आर्थिक अडचणींवर ते कोणाशीही चर्चा करत नाहीत.  आर्थिक सल्लागार एड कोएंब सांगतात, “आर्थिक अडचणींविषयी सल्ला घेण्यासाठी कोणाशी चर्चा करण्यास लोकं संकोच करतात. जसे की लैंगिक समस्यांमुळे जोडप्यांमध्ये तणाव निर्माण होतो, त्याप्रमाणे पैशांमुळेही नात्यामध्ये दरी तयार होते.   पैसे कमवण्यापेक्षा तो खर्च कोण करतो हे महत्त्वाचे आहे. अनेकदा या मुद्द्यामुळे वाद उद्भवतात. बऱ्याच कुटंुबांमध्ये पुुरुष पैसे देतात  तर  महिला खर्च करतात. गृहिणी किराणा, मुलांचे कपडे यासोबंतच घरात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंची खरेदी करतात. कोएंब सांगतात की , “अशा स्थितीत  कमावणाऱ्या  पुरुषाला वाटते की, त्याचा फायदा उचलला जात आहे. अमेरिकेत  घर चालवण्याचा  खर्च  वाढल्याने युवकांसमोर अडचणी वाढल्या आहेत. यामु‌ळे  कौटुंबिक आर्थिक नियोजन  व  सल्ला देण्यामध्ये वाढ झालेली आहे. अमेरिकेमध्ये २६% महिलांची घरगुती खर्च  करण्यात प्रमुख भूमिका असते. पती-पत्नीच्या उत्पन्नात जास्त फरक नसूनही पैसा हा कळीचा मुद्दा आहे.  ज्या पुरुषांची पत्नी जास्त पैसे कमावते, त्या नात्यामध्ये जास्त तणाव निर्माण होतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.  यामुळे महत्त्व कमी झाल्याचे पुरुषांना वाटते. असे नसले तरीही आर्थिकविषयक तणावामुळे मानसिक स्वास्थ्यावर मोठा परिणाम होत असतो.    

पैशांची माहिती लपवल्याने नात्यावर परिणाम
२०१२ च्या एका अभ्यासात इतर प्रकरणांच्या तुलनेत  पैशांमुळे वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे लग्न मोडल्याचे प्रकार घडले आहे.  काही विश्लेषणांनुसार खर्चामुळे पति-पत्नी मध्ये भांडण होणे हे सामान्य कारण बनले आहे.   मार्चमध्ये सायंटिफिक जर्नल प्लॉसमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार पैशांची माहिती लपवल्याने  वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत आहे. 
 
26% विवाहित व्यक्ती जोडीदारापासून पैशांशी संबंधित माहिती लपवतात. 
25 % अमेरिकी महिला पैसे कमावणाऱ्या परिवारातील प्रमुख सदस्य आहेत.
29 लाख रु. आहे, २५ ते ३४ वयाच्या अमेरिकींवर  सरासरी कर्ज.
 
(टाइम आणि टाइम लोगो टाइमचे  रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहेत. यांचा उपयोग करारांतर्गत केलेला आहे. )
 
 

बातम्या आणखी आहेत...