business special / ताजमहालला पाहणे झाले महाग, बघण्यासाठी जारी केली नवीन टोकन सिस्टम


जर पर्यटकांनी 3 तासापेक्षा अधिक वेळ घालवला तर त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल

दिव्य मराठी वेब

Jun 12,2019 06:42:00 PM IST

यूटिलिटी डेस्क- ताजमहाल पाहायला जाणे प्रत्येक पर्यटकासाठी एक पर्वणीच असते. पण आता ताजमहालचे दर्शन महागले असून यासाठी 3 तासांचा प्रतिबंधही करण्यात आला आहे. त्यामुळे आता ताजमहालात तीन तासांपेक्षा अधिक वेळ घालवणाऱ्या दर्शकांना अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. वाढत्या पर्यटकांमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

कशी आहे नवीन व्यवस्था?
ताजमहलमध्ये टर्न स्टाइल गेटवरून पर्यटकांचा प्रवेश सुरू करण्यात आला आहे. हा गेट ताजच्या पूर्व आणि पश्चिम गेटवर बनवण्यात आला आहे. तसेच नवीन व्यवस्थेनुसार, ताजमहालामध्ये तिकिट स्कॅन करूनच पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. त्यामुळे आपल्या प्रवेश आणि निर्गमनाची वेळ लक्षात येईल.

जर पर्यटकांनी 3 तासापेक्षा अधिक वेळ घालवला तर त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल. पर्यटकांना हा शुल्क गेटवर भरावा लागेल. तसेच, प्रवेशाची वेळही लागू करण्यात येईल आणि जर पर्यटक दिलेल्या वेळेत परतले नाही, तर त्यांचा प्रवेश निषीद्ध ठरवल्या जाईल. त्यामुळे पर्यटकांना पुन्हा तिकिट काढावे लागेल.

मिळणार वेगवेगळ्या रंगाचे शिक्के
यासाठी लवकरच रिजार्च कॉइनची सुविधा सुरू करण्यात येईल. पर्यटकांच्या आवश्यतेनुसार हे रिचार्ज केले जाणार असून यासाठी ताज परिसरातील रॉयल गेटवर काउंटर ठेवण्यात येणार आहेत.

एएसआय अधिकाऱ्यांनुसार, ही व्यवस्था लागू करण्यापूर्वी काही बदल केले जात आहेत. त्यानंतरच कॉइन दिले जातील, त्यामुळे टर्न स्टाइल गेटवर बॉक्स लावण्यात आले आहेत.

विदेशी पर्यटकांसाठी निळे कॉइन, भारतीयांसाठी ग्रे आणि सार्क देशांतील पर्यटकांसाठी पिवळे कॉइन दिले जाणार आहे. तसेच, पाच वर्षाच्या मुलांसाठी असलेले जीरो व्हॅल्यूचे तिकिट सुरू राहील.

X
COMMENT