आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वॉशिंग्टन : अमेरिकेत थँक्स गिव्हिंगच्या निमित्ताने नवा ट्रेंड पाहायला मिळू लागला आहे. आता लोक परिचितांऐवजी अनोळखी लोकांसोबत हा आनंदी क्षण व्यतीत करू इच्छितात. त्यामागील कारण अतिशय सकारात्मक आहे. एकटेपणाने जगणाऱ्यांना ते एकटे नसल्याचे जाणीव करून देण्याचा आजच्या पिढीचा उद्देश आहे.
वास्तविक अमेरिकेत एकटे राहणारे, कुटुंबापासून विभक्त राहणाऱ्या वृद्धांची संख्या जास्त आहे. अशा लोकांचा एकटेपणा, रितेपण दूर करण्याचा विचार दोन्ही बाजूने लाभदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. एडम नाआेर व त्यांच्या मित्रांनी मॅनहॅटन येथील अपार्टमेंटमध्ये थँक्स गिव्हिंग दिनी अशा प्रकारची जाहिरात प्रकाशित केली. सामाजिकदृष्ट्या मजेशीर डिनर करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक एकट्या व्यक्तीचे स्वागत. अशा आशयाची त्यांनी जाहिरात दिली. नोआर म्हणाले, माझे कुटुंब कॅलिफोर्नियात राहते. मित्राचे कुटुंब जर्मनीत असतेे. म्हणूनच आम्ही आमच्या आनंदात एकटेपणात जगणाऱ्या लोकांना सहभागी करून घेऊ इच्छित होतो.
नोआर यांच्याप्रमाणे अनेक लोक छोटेखानी स्वरूपात आपल्या घरात आयोजन करतात. काही लोक व्यापक पातळीवर त्याचे आयोजन करतात. नवीन ट्रेंड अयशस्वी होण्याची शक्यताही आहे. कारण पहिल्यांदा भेटणारे लोक संकोचण्याची शक्यता असते. अनेकदा त्यांना आणखी एकट वाटू शकते. परंतु अशा पार्ट्यांमध्ये अशा विचारसरणीचे लोक आपोआप जोडले जातात. काळ बदलत असताना अमेरिकेतील लोक अनोळखींच्या दिशेने वळू लागले आहेत, हे मात्र तितकेच खरे आहे. कारण ते आता आपल्या सुट्या मुले, परिचत यांच्याव्यतिरिक्त एकसमान विचार असलेल्या लोकांसोबत व्यतीत करू इच्छितात. जिसले सोटोने थँक्स गिव्हिंग फीस्टसाठी ५० पाहुण्यांना निमंत्रण दिले आहे. त्यापैकी २० लोक त्यांच्यासाठी पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. पूर्वी ते त्यांना कधीही भेटलेले नव्हते. जिसले शाकाहारी आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबासोबत भोजन करणे त्यांच्यासाठी संकोच वाढवणारे ठरते. त्यामुळे त्यांनी शाकाहारी लोकांना निमंत्रण दिले. सारा स्कॉट हिचिंग्ज पाच वर्षांपासून लोकांना थँक्स गिव्हिंग डेनिमित्त रेडिटच्या माध्यमातून निमंत्रण देत आहेत. त्या म्हणाल्या, पाहुण्यांत ८० वर्षीय महिलाही आहेत. यंदा त्यांच्या घरी ८० लोक एकत्र आले होते. कुटुंब किंवा मित्रांसमवेतचा जल्लोष कधी तरी कडवेपणाही आणू शकतो. परंतु अनोळखीच्या बाबतीत अशा मतभेदांची शक्यता नसते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.