नवीन ट्रेंड / नवीन ट्रेंड : चांगले काम करण्यासाठी गुगल, फेसबुक या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना विनोदाचे प्रशिक्षण

दिग्गज कंपन्या उत्पादकता वाढवण्यासाठी कॉमेडी क्लबकडे आकर्षित होत आहेत

वृत्तसंस्था

Sep 08,2019 07:24:00 AM IST

शिकागो - अमेरिकेच्या शिकागोचा सेकंड सिटी कॉमेडी क्लब गेल्या ६० वर्षांपासून सर्वश्रेष्ठ विनोदासाठी प्रख्यात आहे. तेथे जोआन रिव्हर्स, जॉन कँडी आणि बिल मुरे यांसारख्या हॉलीवूडच्या प्रख्यात विनोदवीरांनी सादरीकरण केले आहे, पण काही दिवसांपासून ते जगातील मोठमोठ्या मॅनेजर्सना प्रशिक्षण देण्यासाठी चर्चेत आहेत. ट्विटर, गुगल, फेसबुक, नाइकी, निसान, मॅकडोनाल्ड्ससारख्या मोठमोठ्या कंपन्या आपले मॅनेजर्स, इंजिनिअर्स आणि एक्झिक्युटिव्हजना येथे विनोदाच्या प्रशिक्षणासाठी पाठवत आहेत. सेकंड सिटी कॉमेडी क्लबचे प्रमुख (अॅपलाइड इम्प्रूव्हायझेशन) केली लेनार्ड म्हणाले की, या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांनी क्लाएंटशी चांगल्या प्रकारे डील करावे, त्यांच्यात सॉफ्ट स्किल वाढावे हा हेतू. एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांनी रोज चांगल्या मूडमध्ये काम करावे, अशी या कंपन्यांची इच्छा आहे. शेकडो कॉर्पोरेट ग्राहकांच्या मते या क्लासमधून कर्मचाऱ्यांत इतरांच्या आयडिया स्वीकारण्याची भावना येत आहे. ते परस्परांशी मोकळेपणाने चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे त्यामुळे सेकंड सिटी कॉमेडी क्लबचे वार्षिक उत्पन्न ५ कोटी डॉलर आहे, त्यात एक तृतीयांश भाग कॉमेडी क्लासपासून मिळणाऱ्या पैशांचा आहे. क्लबने कंपन्यांसाठी कॉमेडी वर्कशॉप्सची सुरुवात २००२ मध्ये केली होती. त्यांनी ७००वर क्लाएंटसोबत काम केले आहे.

इम्प्रूव्ह असायलम : त्याने गुगलला हसायला शिकवले
इम्प्रूव्ह असायलमही सेकंड सिटी कॉमेडी क्लबसारखा आहे. तो बोस्टन, न्यूयॉर्कमध्ये कॉमेडी थिएटर्स चालवत आहे. त्याने गुगल, पीडब्ल्यूसी, हार्वर्ड, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आदींना प्रशिक्षण दिले आहे. इम्प्रूव्ह असायलमचे सहसंस्थापक आणि सीईओ नॉर्म लॅव्हियोलेटे म्हणाले की, कंपनीने अमेरिकेशिवाय काही महिन्यांत शांघाय, बीजिंग, दुबई, डबलिनमध्येही काम केले आहे.

X
COMMENT