आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिजित राजे आसावरीला देणार प्रेमाची कबुली, प्रेमाने पुढे केलेल्या हातात आसावरी देईल का हात...? 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी...  या सगळ्यामुळे ही मालिका अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय. ही मालिका आता एका अतिशय विलक्षण वळणावर आली आहे.

अभिजित राजे आणि आसावरी यांच्यातील मैत्रीच नातं दिवसेंदिवस दृढ होतंय. अभिजित आसावरीवर कुठलंही संकट येऊ नये म्हणून नेहमीच तत्पर असतो. त्याच्या मनातील असावारीसाठी असलेल्या भावना अभिजित तिच्या समोर व्यक्त करण्यासाठी अभिजित योग्य वेळेची वाट बघतोय. आगामी भागात अभिजित राजे आसावरीला त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे. अभिजितने आसावरीसमोर आपलं प्रेम व्यक्त केल्यावर आसावरीची प्रतिक्रिया काय असेल? शुभ्रा या सगळ्यात सासूबाईंना कशी मदत करणार? सोहम आणि आजोबांची काय प्रतिक्रिया असेल? हे येणाऱ्या काही भागात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.