आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवाला मिळणार सिध्दीची साथ! रुद्रायत गावामध्ये रंगणार सुरमारीची स्पर्धा 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः प्रत्येक नात्याचा पाया प्रेम आणि विश्वास असतो. नवरा - बायकोच्या नात्यामध्ये याच दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. 'जीव झाला येडापिसा' मालिकेमध्ये शिवा आणि सिध्दीचे नाते आणि त्यांचा लग्नानंतरचा प्रवास जरा वेगळाच आहे असे म्हणायला हरकत नाही. लग्न झाले तेव्हापासूनच दोघांनाही या लग्न बंधनामधून सुटका हवी आहे. पण, सिद्धी घरातील काही जिवाभावाच्या माणसांकडे बघून अजूनही लष्करेंच्या घरामध्ये रहाते आहे. आता मात्र शिवा – सिद्धीच्या नात्याला निर्णायक वळण मिळणार आहे यात काही शंका नाही. 


लवकरच रुद्रायत गावामध्ये प्रसिध्द अशी सुरमारीची स्पर्धा रंगणार आहे. या सुरमारीच्या स्पर्धेत जो कोणी विहीरीतून नारळ पहिले बाहेर काढेल त्या व्यक्तीची सत्ता गावामध्ये रहाते अशी परंपरा आहे. या स्पर्धेत दरवर्षी आत्याबाईंसाठी शिवा विहीरीमधून नारळ बाहेर काढत आला आहे आणि यावर्षीदेखील आत्याबाईंना त्याच्याकडून हीच अपेक्षा आहे. सगळे नीट सुरू असताना सुरमारीच्या स्पर्धेत शिवावर जीवघेणा हल्ला होणार आहे आणि हे सिध्दीला कळताच ती शिवाचा जीव वाचविण्यासाठी विहीरीमध्ये उडी मारणार आहे.  

सिध्दी आणि शिवाचे नाते एका नाजुक वळणावरून जात असतानाच, शिवाबद्दल मनामध्ये इतका राग - द्वेष असताना सिध्दी असे का करणार ? सिध्दी – शिवाच्या नात्यामध्ये काय बदल घडतील ? शिवा आणि सिध्दीच्या आयुष्यात इतके सगळे घडले असताना प्रेमाचा, मैत्रीचा रंग येऊ शकेल ?  शिवा -  सिद्धीच्या नात्यातील दरी या घटनेनंतर कमी होईल ? हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.