Home | Bollywood | Marathi Cinekatta | New Twist In Marathi Serial Baji

Telly World: शेरा रूप बदलून परत पुण्यात शिरलाय!! 'बाजी' मालिकेत नवा ट्विस्ट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 10, 2018, 12:21 PM IST

'बाजी' या मालिकेतला बहुरूपी खलनायक शेरा हा त्याचं दुसरं रूप घेऊन पुण्यात परत शिरला आहे.

 • New Twist In Marathi Serial Baji

  एंटरटेन्मेंट डेस्कः झी मराठीवरील 'बाजी' या मालिकेतला बहुरूपी खलनायक शेरा हा त्याचं दुसरं रूप घेऊन पुण्यात परत शिरला आहे.तो आता कुबेरासारख्या श्रीमंत हिरे व्यापाऱ्याचं सोंग घेऊन परत आला आहे.मराठी साम्राज्याला जहिरीला डंख मारायला पुण्यात शिरलाय हा शेरा!

  पेशवाईच्या कालखंडाच्या पार्श्वभूमीवरच्या या मालिकेतला खलनायक सध्या चर्चेत आहे.

  म्हातारा बनून वेगवेगळी कट कारस्थानं रचून पेशवाईत हैदोस घालण्याच्या इराद्यानं शिरला होता. पुण्याच्या कोतवालीतला प्रामाणिक शिलेदार बाजी यानं त्याला मारलं. पण तो खरच मेला आहे की जिवंत आहे,हे एक रहस्य आहे.आणि त्याचा मृत्य झाला नसेल तर नेमकं त्याने काय घडवून आणलं हा ही एक उत्सुकतेचा विषय आहे. ऐतिहासिक घटनांचे संदर्भ घेत लिहिली गेलेली बाजी ही एक रहस्य कथा आहे,निजामाच्या कारस्थानाचा भाग म्हणून शेरा पेशवाई खळखिळी करण्यासाठी शेरा पुण्यात आला आहे.

  तो केंव्हा काय करेल याचा अंदाज बांधता येत नाही, अभिनेते प्रखर सिंग यांनी ही भूमिका साकरली असून त्याच्या अभिनय शैलीची आणि संवादाची खूप प्रशंसा होत आहे.या पात्राच्या तोंडी असलेल्या "हिंदुस्थान की राजनीती का दिमाग है शनिवारवाडा और हिंदुस्थान की खूबसुरती का दिल बावनखनी" अशा संवादांनी हे पात्र अधिक रंगतदार झालं आहे. या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केलं असून झी मराठीवर ही मलिका सोमवार ते शनिवार रोज रात्री साडेदहा वाजता प्रसारीत होते.

 • New Twist In Marathi Serial Baji
 • New Twist In Marathi Serial Baji
 • New Twist In Marathi Serial Baji

Trending