आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सध्या लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेने नुकतेच 500 भागांचा टप्पा पार केला. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो. नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेतील अनुभवलेला ट्विस्ट म्हणजे राणाला मॅटवरची कुस्ती शिकवायला आलेली नवीन लेडी मॅनेजर. आधीच राणा त्याच्या नंदिता वहिनींचा शब्द पाळण्यासाठी त्याच्या मनाविरुद्ध मॅटवरची कुस्ती खेळायला तयार झाला आहे आणि त्यात मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या राणाला मॅटवरची कुस्ती शिकवण्यासाठी एक लेडी मॅनेजर म्हणजेच सखी यांनी राणादावर अनेक निर्बंध लादले आहेत आणि राणादा वैतागून गेला आहे.
राणादाच्या चमचमीत चिकन व मटण खाण्यावर बंदी आणल्यानंतर आता मॅनेजरबाईंनी सायकलकडे मोर्चा वळवला आहे, त्यांनी राणाला सायकल चालवायला सांगितली आहे आणि तीसुध्दा सलग 20 किलोमीटर. राणादाला याचा प्रचंड राग आला आहे, पण सायकल चालवण्याशिवाय त्याच्याकडे आता कुठला पर्यायच नाही. मॅनेजर बाईंनी दिलेल्या प्रत्येक कसरतीतून राणा पळवाट काढतोय. तिने दिलेलं डाएट, सायकलिंग, स्विमिंग याचं आव्हान स्वीकारण्यासाठी राणा तयारच नाही आहे.
मॅटवरील कुस्ती शिकण्यासाठी राणाला फिट राहणं खूप गरजेचं आहे आणि तो काहीच करू शकत नाहीये अशा मताची सई आहे. तो मुंबईमध्ये 2 दिवसपण टिकणार नाही अशी टीका सई करते, पण तिच्या बोलण्याला न जुमानता अंजली राणाला पाठिंबा द्यायचं ठरवते आणि तिने दिलेलं आव्हान स्वकारते. राणा मुंबईला जाऊन तिथल्या जीवनशैलीशी जुळवून घेईल असं ठाम मत अंजली सई समोर मांडते. अंजली यासाठी राणाला कसं तयार करेल? राणा चालू असलेल्या सर्व गोष्टींशी जुळवून घेऊ शकेल? हे प्रेक्षकांना येत्या रविवारी प्रसारित होणाऱ्या 2 तासांच्या विशेष भागात पाहायला मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.