आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहीत नसलेल्या बाबी : हॉर्न मोठ्याने वाजवल्यास 10 हजार दंड, 3 महिने कैद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पांडे 

नवीन मोटार वाहन कायद्यांतर्गत आता वाहन उत्पादक, डिलर, पार्ट्स बनवणारा, वाहनात बदल करणारा डिलर किंवा दुकानदारावर दंड लावला जाऊ शकतो. आधी अशी तरतूद नव्हती. एकच पार्ट्स अनेक गाड्यांमध्ये खराब होत असेल तर तो पार्ट्स खराब असल्याचे मानले जाईल आणि याला वाहन उत्पादक किंवा डिलर जबाबदार असेल. सुरक्षेशी संबंधित समस्या असल्यास १०० कोटी रुपये दंड द्यावा लागेल. हॉर्न मोठ्याने वाजवल्यास दंड आणि कैद होऊ शकते.

  • प्रशिक्षणानंतर पुन्हा देता येईल चाचणी

ड्रायव्हिंग परवानाचाचणीत तीनदा अपयश आल्यानंतर चालकाला प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानंतर चौथ्यांदा चाचणी देता येईल.

  • कोंडी केल्यास दंड

गाडी थांबवल्याने रस्ता बंद होत असेल, वाहतूक कांेडी होत असेल तर ५०० रु. दंड होऊ शकतो. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यासही दंड.

  • वाहनात बदल केल्यास १५ हजारांचा दंड

वाहनात बदल केल्यास वाहन मालक व दुकानदाराला १५ हजार रु. दंड द्यावा लागेल. जसे वाहनात प्रेशर हॉर्न, वेगवेगळे दिवे, वाचता येणार नाही अशी किंवा काहीतरी लिहिलेली नंबर प्लेट. मर्यादेपेक्षा जास्त हॉर्न वाजवल्यास १० हजार दंड, ३ महिन्याची कैद आणि तीन महिन्यासाठी परवाना निलंबित होऊ शकतो.

  • चाचणी

तीनदा चाचणीत अपयशी झाल्यास प्रशिक्षण केंद्रातून अभ्यासक्रम करणे आवश्यक

  • दिव्यांगांनाही परवाना

दिव्यांगांनाही परवाना देण्यात येणार आहे. मात्र, परिवहन अधिकाऱ्याच्या खात्रीनंतर परवाना देण्यात येईल.

  • एजन्सींसाठी परवाना आवश्यक

आतापर्यंत ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या कंपन्यांसाठी कोणतेही नियम नव्हते. आता मात्र, त्यांना परवाना अनिवार्य करण्यात आला आहे.