Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | New world record in Jalgaon

जळगाव : 6 तासांत बनवले 3 हजार किलाे वांग्याचे भरीत, दीड तासातच पाडला फडशा

प्रतिनिधी | Update - Dec 22, 2018, 07:23 AM IST

शेफ विष्णू मनोहर यांच्यासह अनेकांचा सहभाग, गिनीज बुक नोंदीसाठी दावा

 • New world record in Jalgaon

  जळगाव- खान्देशी वांग्याच्या भरिताला प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी जळगावात ३ हजार किलाे भरीत तयार करण्यात आले. प्रसिद्ध शेफ विष्णू मनाेहर यांच्यासाेबत शेकडो सहकऱ्यांनी केलेल्या या भरिताचा खाद्यप्रेमींनी दीडच तासात फडशा पाडला.

  - वांगे भाजण्यापासून ते भरीत तयार हाेण्यापर्यंतची प्रक्रिया सुमारे सहा तास चालली. २५०० किलाे भरिताचे नियाेजन हाेते. ५०० किलाे जास्त भरीत तयार झाले. या उपक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डच्या प्रमाणपत्रासाठी ४ महिने वाट पाहावी लागेल. इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड व एशिया बुक ऑफ रेकाॅर्डकडूनही या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र ८ दिवसांत मिळेल.

  ३,९०० किलाे वांगे
  १२० किलाे तेल
  १०० किलाे काेथिंबीर

Trending