आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • New Year 2019 First Day Safla Ekadashi What To Do

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षाच्या पहिल्या दिवशी शुभ योगात करा हे 6 काम, घरात कायम राहील सुख-समृद्धी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावेळी वर्ष 2019 ची सुरुवात मार्गशीर्ष मासातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीपासून होत आहे. या एकादशीला सफला एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते. वर्षातील पहिल्या दिवशी एकादशी आणि मंगळवारचा योग जुळून आल्यामुळे या एकादशीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या शुभ योगामध्ये काही खास काम केल्यास घरात सुख-समृद्धी राहते. हे काम खालीलप्रमाणे आहेत...


1. मंगळवारी सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीची पूजा करावी आणि जल अर्पण करावे. यासोबतच संध्याकाळीसुद्धा तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा.


2. भगवान श्रीकृष्णाला खीर नैवेद्य दाखवावी. यामध्ये तुळशीचे पाने अवश्य टाकावीत. यामुळे श्रीकृष्ण प्रसन्न होतात.


3. कुटुंबातील मोठ्या सदस्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा. शक्य असल्यास घरातील आपल्यापेक्षा लहान सदस्यांना एखादी भेट वस्तू द्यावी.


4. एकादशीला दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरम कपडे, उदा. स्वेटर, शॉल, चादर इ. दान करावे.


5. एका एकादशीला दीपदानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी नदी किंवा तलावावर जाऊन दीपदान करावे.


6. रात्री झोपू नये. भगवान श्रीकृष्णाचे भजन आणि कीर्तन करावे.