आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कोणत्या धर्मामध्ये नवीन वर्षाची सुरवात केव्हा होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नविन वर्षाची सुरवात प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या वेळी आणि निरनिराळ्या प्रथेने केली जाते. एखाद्या धर्मात गाणे गाऊन, नृत्य करुन तर काही ठिकाणी पुजा-पाठ करुन नविन वर्षाच स्वागत केले जाते. जगात सर्वात जास्त ईसाई पद्धतीने नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा आहे. ईसाई वर्ष हे 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंत असे 12 महिन्यात विभागलेले असते.


ईसाई नविन वर्ष
ईसाई लोक 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करतात. जवळजवळ 4000 वर्षांपूर्वी बेबीलोनमध्ये नवीन वर्ष 21 मार्चला साजरे केले जायचे, याच दिवशी वसंत ऋतूला सुरवात होते असेही मानले जाते. जेव्हा हुकूमशाह ज्युलियस या रोमन सम्राटाने इ.स.पु.र्व. 45 साव्या वर्षी ज्युलियस कॅलेंडरची स्थापना केली. तेव्हा जगात पहिल्यांदा 1 जानेवारीला नविन वर्षचा उत्सव साजरा केला गेला. हे सर्वधिक प्रचलित नवीन वर्ष आहे.


हिंदू नववर्ष
हिंदू नववर्षाची सुरवात चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासुन होते. याला हिंदू नवीन संवत्सर किंवा संवत असेही म्हणतात. याच दिवसापासुन ब्रह्मदेवाने विश्वाच्या नर्मितीला सुरवात केली, असेही सांगितले जाते. याच दिवसापासुन  विक्रम संवतच्या नवीन वर्षाची सुरवात होते. इग्रंजी कॅलेंडरप्रमाणे ही तारीख एप्रिल महिन्यात येते. हा उत्सव गुढीपाडवा नावाने भारतातील विविध भागात साजरा केला जातो.


सिंधी नवीन वर्ष
सिंधी नव वर्षाची सुरवात चेटीचंड उत्सवापासून होते. हा उत्सव चैत्र शुक्ल द्वितीयेला साजरा केला जातो. सिंधी मान्यतेनुसार याच दिवशी वरूणराजाच्या अवतारातील भगवान झुलेलाल यांचा जन्म झाला.


शीख नवीन वर्ष
पंजाबमध्ये नवीन वर्षाचे स्वागत बैसाखी उत्सव साजरा करुन केले जाते. हा सण एप्रिल महिन्यात येतो. शीख नानकशाही कॅलेंडरनुसार होळीच्या दुस-या दिवसापासून नवीन वर्षाची सुरवात होते.


जैन नवीन वर्ष
जैन नववर्ष दिवाळीच्या दुस-या दिवसापासून सुरू होते. महावीर स्वामींच्या मोक्ष प्राप्ती दिवसाच्या दुस-या दिवसापासुन जैन नववर्षाला सुरवात होते. याला वीर नर्वाण सवंत असेही म्हणतात.


पारशी नवीन वर्ष
पारशी धर्मात नववर्ष नवरोजच्या रुपात साजरे केले जाते. 19 ऑगस्टला पारशी लोक नवरोजचा सण साजरा करतात. 3000 वर्षांपूर्वी शाह जमशेदजी यांनी पारशी धर्मात नवरोज साजरा करण्यास सुरवात केली. नव म्हणजे नवीन आणि रोज म्हणजे दिवस, असा नवरोज चा अर्थ आहे.

बातम्या आणखी आहेत...