आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या उद्यापासून तुमच्या खिशावर काय हाेणार परिणाम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या अशा १० बदलांची संक्षिप्त माहिती
  • नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे नवीन नियम लागू हाेतील.

१ जानेवारी २०२० पासून बदलांचे नवीन पर्व सुरू हाेईल. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे नवीन नियम लागू हाेतील. यात पीएफ, विमा, दागिने, ऑनलाइन व्यवहारांच्या नियमाचा समावेश आहे. जाणून घ्या अशा १० बदलांची संक्षिप्त माहिती...

पीएफ : स्वत:च ठरवाल याेगदान 


दहा कर्मचारी असलेल्या कंपन्या पीएफच्या अखत्यारीत येतील. कर्मचारीच पीएफचे याेगदान निश्चित करतील. पेन्शन फंडातून एकरकमी रक्कम काढता येईल.

एनईएफटी : देण्याघेण्यावर शुल्क नाही 

नवीन वर्षापासून आता बँकांत एनईएफटीद्वारे  व्यवहारावर शुल्क द्यावे लागणार नाही. एनईएफटी आता आठवड्यातून सात दिवस चाेवीस तास हाेऊ शकेल. भारत बिल पेमेंट यंत्रणा प्रीपेड साेडून बिलांची रक्कम अदा करता येऊ शकेल.

रुपे-यूपीआय : आता शुल्क नाही 

५० काेटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना बिना एमडीआर शुल्काशिवाय रुपे कार्ड, यूपीआय क्यूआर काेर्डद्वारे अदा करण्याची सुविधा असेल.

विमा पॉलिसी : हप्ता महाग हाेणार

इर्डाने चेंज लिंक्ड आणि नाॅन लिंक्ड आयुर्विमा पाॅलिसीमध्ये बदल जाहीर केला आहे. त्यामुळे हप्ता महाग हाेईल. तसेच एलआयसीने क्रेडिट कार्डावरील व्यवहारावर लागणारे शुल्कदेखील संपुष्टात आणण्याची घाेषणा केली आहे.एटीएम : राेख काढण्यासाठी ओटीपी

एसबीआयने एटीएममधून १० हजार रु. पेक्षा जास्त राेख काढण्याचे नियम बदलले आहेत. रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत पैसे काढण्यास आेटीपी अनिवार्य.

 

कर्ज : रेपो रेटचे कर्ज ०.२५ % स्वस्त

एसबीआयने  रेपो रेटशी निगडित कर्जावरील व्याज ०.२५ % घटवले. नव्या दराचा फायदा जुन्या ग्राहकांनाही मिळेल. कारण त्यांची रिसेट तारीखही १ जानेवारी आहे.

 

ज्वेलरी : हॉलमार्किंग आता अनिवार्य

सोन्या चांदीच्या दागिन्यांवर हाॅलमार्किंग बंधनकारक हाेईल, परंतु ग्रामीण भागात एक वर्षापर्यंत सूट असेल. दागिन्यांवरील हॉलमार्किंगचा नियम २००० पासून लागू आहे, परंतु हाॅलमार्किंग बंधनकारक नव्हते. त्यामुळे  आता  किमती वाढू शकतात.

 

पॅन : आधार लिंकसाठी ३ महिने

३१ डिसेंबरपर्यंत आधारशी पॅन लिंक करणे गरजेचे हाेते.  अन्यथा १ जानेवारीपासून पॅनकार्ड मान्य हाेणार नव्हते . आता मार्च २०२० पर्यंत  वेळ मिळाला आहे.डेबिट कार्ड : फक्त चिप कार्ड चालेल

३१ डिसेंबरपर्यंत जुन्या डेबिट कार्डचे रूपांतर इलेक्ट्राॅनिक चिप असलेल्या कार्डात करणे गरजे आहे. नवीन वर्षात जुन्या डेबिट  कार्डाने राेख काढता येणार नाही. यात ग्राहकांचा डेटा ओळखणारी मॅग्नेटिक पट्टी उपयाेगाची राहणार नाही.
 
 
 
फास्टॅग : आता जरुरी, अन्यथा टोल दुप्पट
१५ जानेवारीनंतर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना फास्टॅग अनिवार्य असेल. १ काेटी फास्टॅग दिले आहेत. फास्टॅग नसेल तर टाेल दुप्पट हाेईल.
 
 

बातम्या आणखी आहेत...