आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्ष 12 राज्यांत घेऊन येणार 2 दिवस कडाक्याची थंडी, गारा-पाऊस; प्रदूषणामुळे धुक्यात वाढ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली - गेल्या दाेन दिवसांपासून शिखरांवर हाेत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम देशातील मैदानी राज्यांत दिसू लागला आहे. थंडीच्या लाटेमुळे कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. आगामी ४८ तासांत या वातावरणापासून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. ३१ डिसेंबर व १ जानेवारीला गारांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार संपूर्ण हरियाणा, चंदिगड, दिल्ली, उत्तर राजस्थान, बिहारसह पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आेडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीमच्या काही भागात दाेन दिवसांत हुडहुडी भरणारी थंडी पडेल. ३१ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत संपूर्ण पूर्व व मध्य भारतात पावसासाेबत गारा पडण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात २ जानेवारीपर्यंत थंडी ठाण मांडून राहील. त्याशिवाय आगामी तीन दिवस या भागात दाट धुकेही पसरू शकते. मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, सिक्कीम व आेडिशातही दाेन दिवस धुक्याचे साम्राज्य दिसेल. ३० डिसेंबरनंतर ४-५ दिवसांपर्यंत ईशान्येकडील भागात धुके दिसून येईल. 

किनारी भागात पाऊस : हवामान विभागानुसार उत्तर अफगाणिस्तानच्या वरील भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे. हवामानातील ही प्रणाली ३० डिसेंबरपासून पश्चिम हिमालयावर प्रभाव टाकू शकते. पूर्व आसाममध्ये वादळी वाऱ्याचे क्षेत्र तयार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व आेडिशाच्या किनारपट्टीवर पाऊस हाेऊ शकताे. ईशान्येकडील काही राज्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेऊ शकताे.  

४८ तासांत ३८ लाेकांचा मृत्यू 
प्रचंड थंडीच्या लाटेमुळे उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब, राजस्थानमध्ये सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेशात ४८ तासांत ३८ लाेकांचा मृत्यू झाला. बिहारमधील पाटणा, गया, भागलपूर, पूर्णिया जिल्ह्यात पारा घसरला आहे. त्यामुळे थंडीने अनेकांचा मृत्यू झाला.

दिल्लीत सर्वात कमी तापमानाचा डिसेंबर

काश्मीर : माेसमातील गाेठवणारी रात्र, उत्तराखंडमध्ये पारा शून्याहून नीचांकी
दिल्लीत यंदा डिसेंबर गेल्या शंभर वर्षांतील दुसरा नीचांकी महिना ठरला. १९०१ ते २०१८ पर्यंत केवळ चार वेळा डिसेंबर सामान्य तापमानाहून २० अंश सेल्सियसपेक्षा नीचांकी राहिला. यंदा २६ डिसेंबरपर्यंत १९.८५ आहे. ३१ डिसेंबरपर्यंत १९.१५ राहू शकते. शुक्रवारी दिल्लीत किमान तापमान ४.२ अंश हाेते. जम्मूत गुरुवारच्या रात्री पारा उणे-१०, श्रीनगर उणे-५.६ अंशावर हाेता. उत्तराखंडमध्ये पारा शून्याच्याही खाली हाेता. 

हवामान बदलामुळे ऋतू रंगही बदलले, प्रदूषणामुळे धुक्यात वाढ : सीसीसीआर
पुण्याच्या सेंटर फाॅर क्लायमेट चेंज रिसर्च (सीसीसीआर) संस्थेचे संशाेधक डाॅ. भूपिंदर सिंह यांच्या मते, हवामान बदल वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या तीव्रतेवर परिणाम करू लागले आहे. त्यातूनच यंदा पारा आणखी नीचांकी जाऊ शकताे. जास्त प्रदूषणामुळे धुके वाढू शकते. हवामान विभागाच्या वैज्ञानिकांच्या मते काही वर्षांत हवामान बदलाचा अनपेक्षित पॅटर्न सुरू आहे. त्याचा ऋतूंवरही गंभीर परिणाम हाेईल.