आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

World Cup 2019 : सलग दुसऱ्या दिवशी वर्ल्ड चॅम्पियन टीम दीडशे धावा करण्यात अपयशी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्डिफ - यंंदाच्या विश्वचषकामध्ये माजी वर्ल्ड चॅम्पियन संघांना अद्याप समाधानकारक अशी खेळी करता आली नाही. त्यामुळेच विश्वचषकात सलग दुसऱ्या दिवशी माजी विजेत्या संघाला धावांचा दीडशेचाही आकडा पार करता आला नाही. न्यूझीलंडविरुद्ध आपल्या पहिल्याच सामन्यात १९९६ च्या विश्वविजेत्या श्रीलंका संघाला १३६ धावांवर आपला गाशा गुंडाळावा लागला. कर्णधार आणि सलामीवीर दिमुथ करुणारत्ने हा ५२ धावांसह शेवटपर्यंत मैदानावर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने १६.१ षटकांत एकही विकेट न गमावता आवाक्यातले लक्ष्य गाठले. सलामीवीर मार्टिन गुप्तिल (७३) आणि काेलीन मुन्राे (५८) यांनी अभेद्य शतकी भागीदारीच्या बळावर विजयश्री खेचून आणली.  


दाेन दिवसांत दाेन वर्ल्ड चॅम्पियन १५० धावांचा पल्ला गाठू शकले नाहीत. यापूर्वी शुक्रवारी विंडीजविरुद्ध सामन्यात १९९२ च्या चॅम्पियन पाकला १०५ धावांवर आपला गाशा गुंडाळावा लागला.


मॅट हेन्री, फर्ग्युसनची धारदार गाेलंदाजी : न्यूझीलंडकडून मॅट हेन्री व फर्ग्युसनने धारदार गाेलंदाजी केली. त्यांनी प्रत्येकी ३ विकेट घेऊन श्रीलंका टीमची दाणादाण उडवली.  सात षटकांत २९ धावा देत तीन बळी घेणारा हेन्री हा सामनावीरचा मानकरी ठरला.