आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • New Zealand Defeats India To Make It To The Finals Of Cricket World Cup 2019

सव्वाशे कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले! भारताला पराभूत करून न्यूझीलंड फायनलमध्ये, धोनी-जडेजाची पार्टनरशिप व्यर्थ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवासह अब्जावधी भारतीयांचे क्रिकेट विश्वचषकाचे स्वप्न भंगले आहे. न्यूझीलंडने भारताला पराभूत करून फायनलमध्ये मजल मारली. गेल्या तीन विश्वचषकांमध्ये विराटच्या नेतृत्वात भारताचे हे तिसरे अपयश आहे. सामन्यात न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 240 धावांचे आव्हान दिले होते. यात महेंद्र सिंह धोनी आणि रविंद्र जडेजा यांच्या जोडीने सर्वाधिक 116 धावा ठोकल्या. परंतु, भारतीय संघ केवळ 221 धावांवरच सर्वबाद झाला आणि दोन्ही खेळाडूंची बॅटिंग व्यर्थ गेली.

 

वर्ल्डकपमध्ये विराटचे सलग तिसरे अपयश
कर्णधार विराट कोहली वर्ल्ड कप करिअरच्या सेमीफायनलमध्ये सलग तिसऱ्यांदा फेल ठरला आहे. 2011 मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये केवळ 9 धावा काढल्या होत्या. तर 2015 च्या वर्ल्ड कप सेमिफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात तो केवळ एक रन काढू शकला होता. यावेळी न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये सुद्धा तो सपशेल अपयशी ठरला. त्याने या सामन्यात केवळ एक धाव काढली आहे.

 

जडेजाने 5 वर्षांनंतर ठोकला अर्धशतक

न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये केवळ महेंद्र सिंह धोनी आणि रविंद्र जडेजा लढले असे दिसून येते. यात धोनीने 50 आणि जडेजाने 76 अशा एकूण 117 धावा काढल्या. जडेजाने 5 वर्षानंतर एका वनडे सामन्यात अर्धशतक ठोकला आहे. यापूर्वी 2014 मध्ये त्याने इंग्लंड विरोधात लीड्सच्या मैदानात अर्धशतक केले होते. ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या प्रत्येकी 32-32 धावा काढून तंबूत परतले. मिशेल सेंटनरने हार्दिक आणि पंत यांना बाद केले. भारताचा पराभव होणार हे सुरुवातीच्या 4 ओव्हरमध्येच प्रेक्षकांना समजले होते. भारताचा कर्णधार विराट आणि हिटमॅन मानल्या जाणारा रोहित शर्माने केवळ एक-एक धाव काढून मैदान सोडले.