आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडचा वेगवान गाेलंदाज ट्रेंट बाेल्टने केला विश्वविक्रम; 11 चेंडूंच्या अंतरात घेतले 5 बळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ख्राइस्टचर्च- यजमान न्यूझीलंडचा वेगवान गाेलंदाज ट्रेंट बाेल्टने गुरुवारी पाहुण्या श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसाेटीमध्ये विश्वविक्रम केला. त्याने ११ चेंडूंच्या अंतरात पाच विकेट घेतल्या. यासह त्याच्या नावे कसाेटी क्रिकेटमध्ये कमी चेंडूंमध्ये पाच विकेट घेण्याचा विक्रम नाेंद झाला. त्यामुळे बाेल्टच्या धारदार गाेलंदाजीपुढे श्रीलंका टीमच्या फलंदाजांनी लाेटांगण घातले. यातून टीमला पहिल्या डावात १०४ धावांवर गाशा गुंडाळावा लागला. बाेल्टची ही  करिअरमध्ये सर्वाेत्कृष्ट कामगिरी ठरली. श्रीलंका टीमने पहिल्या डावात चार बाद ८० धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. ९४ धावांवर लंकेची पहिली विकेट राेशन सिल्वाच्या रूपात पडली. त्याला बाेल्टने बाद केले. बाेल्टने पुढच्या १० चेंडूंमध्ये चार विकेट घेऊन विक्रमाला गवसणी घातली. त्यामुळे श्रीलंकेला ४१ षटकांत १०४ धावा काढून पॅव्हेलियन गाठावे लागले. त्यामुळे यजमान  न्यूझीलंड संघाला पहिल्या डावात ७४ धावांची अाघाडी मिळाली. या टीमने घरच्या मैदानावरील दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात १७८  धावा काढल्या. त्यापाठाेपाठ न्यूझीलंड संघाला दुसऱ्या डावात २ गडी बाद २३१ धावा काढता अाल्या. सलामीवीर लाॅथमने ७४ अाणि टेलरने २५५ धावांचे याेगदान दिले.  रावलने ७४ धावांची खेळी केली.

 

८८ वर्षांत पहिल्यांदा सलग चार कसाेटी मालिका जिंकण्याची संधी
न्यूझीलंडला दुसऱ्या कसाेटीत बाजी मारल्यास सलग चाैथ्यांदा कसाेटी मालिका नावे करण्याची संधी अाहे. या टीमच्या नावे ८८ वर्षांच्या इतिहासात हा विक्रम नाेंदवता येईल. यापूर्वी या संघाने विंडीजविरुद्ध २-०, इंग्लंडला १-० व पाकला २-१ ने कसाेटी मालिकेत पराभूत केले हाेते.

 

बातम्या आणखी आहेत...