आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

34 महिलांच्या आंघोळीचे Video बनवले, शॅम्पू बॉटेलमध्ये लपवायचा कॅमेरा; आता मिळणार 14 वर्षांची शिक्षा!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन - न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला तब्बल 34 महिलांचे आंघोळीचे व्हिडिओ बनवून पॉर्न साइटवर अपलोड केल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्याने या महिलांचे 219 सीक्रेट व्हिडिओ बनवले. त्यापैकी अनेक व्हिडिओ पॉर्न साइटवर अपलोड सुद्धा केले. यापैकी काही व्हिडिओमध्ये त्याने महिलांचा देश, त्यांचे प्रोफेशन आणि तपशीलही शेअर केला. या सर्व महिलांना आपला व्हिडिओ रेकॉर्ड होत असल्याची माहिती नव्हती. आणि पकडले जाण्याच्या रिस्कची मज्जा घेण्यासाठी आपण असे केल्याची कबुली त्याने दिली आहे. 


शॅम्पू बॉटलमध्ये कॅमेरा रिमोटने संचलन...
या प्रकरणातील आरोपीचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नाही. न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडवर हॉक्स बे येथे राहणारा आरोपी आपले घर पर्यटकांना तात्पुरते भाड्यावर देत होता. त्याच्या बहुतांश ग्राहकांमध्ये महिलाच होत्या. त्या महिला आरोपीच्या घरी राहत असताना तो गुपचूप त्यांच्या बाथरुममध्ये असलेल्या शॅम्बूच्या बाटलीत सीक्रेट कॅमेरा लावायचा. हा कॅमेरा तो रिमोट कंट्रोलने चालवत होता. त्याच्या पीडितांमध्ये सर्वच महिलांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे. महिला बाथरुममध्ये जाणार असल्याचे संकेत मिळताच तो कॅमेरा ऑन करायचा. यानंतर रात्री तो शॅम्पूची बॉटल अतिशय चलाखीने बदलून रेकॉर्डिंग आपल्या लॅपटॉपमध्ये कॉपी करून घ्यायचा.

 

14 वर्षांची शिक्षा होणार
त्याच्या घरात 9 दिवस थांबलेल्या महिलेने आरोप लावल्यानंतर त्याला फेब्रुवारीत अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी 69 आरोप दाखल केले होते. त्यापैकी बहुतांश आरोपांसाठी कमाल 14 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. कोर्टाने गुरुवारी (9 ऑगस्ट) त्याला दोषी ठरवले आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यात त्याच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...