आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 मशिदीत फायरींग.. 49 जणांचा मृत्यू, नमाज पठणासाठी निघालेले क्रिकेटपटू, हल्लेखोराने फेसबुक लाइव्ह केली घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हेलिंग्टन- न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च शहरातील अल-नूर आणि लिनवुड या दोन मशिदीत शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधूंद गोळीबार केला. स्थानिक वेळेनुसार दुपारच्या नमाझनंतर ही घटना घडली. मीडिया रिपोर्ट्‍सनुसार 49 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

पोलिस घटनास्थळी पोहोचले असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी एका महिलेसह चार जणांना अटक केली आहे. मशिदीबाहेर उभ्या असलेल्या एका कारमध्ये आयईडी मोठ्याप्रमाणात सापडले असून ते डिफ्यूज करण्यात आले आहे.

 

पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. देशासाठी शुक्रवार हा काळा दिवस असल्याचेही जेसिंडा आर्डर्न यांनी म्हटले आहे.

 

हल्लेखोरांनी गोळीबाराची घटना केली फेसबुक लाइव्ह

न्यूझीलंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की हल्लेखोर एक ऑस्ट्रेलियन तरुण ब्रेंटन टॅरेंट होता. त्याने मशिदीत प्रवेश करण्यापूर्वी फेसबुकवर लाइव्ह स्ट्रीमिंग सुरु केले होते. सोशल मीडियावर व्हिडिओ फुटेज व्हायरल होत आहे. हल्लेखोराने मशिदीत घुसल्यानंतर अंदाधूंद गोळीबार केला. दरम्यान, घटनेनंतर फेसबुक आणि ट्विटरने हा व्हिडियो ब्लॉक केला आहे.

 

गोलीबारानंतर हल्लेखो परत आपल्या कारमध्ये बसला. रिपोर्ट्सनुसार , 28 वर्षीय ब्रेंटन याने 37 पानांचे एक मॅनिफेस्टो देखील लिहिले आहे. त्यात त्याने आपला धोकादायक इरादा व्यक्त केला आहे.

 

नमाज पठणासाठी गेले होते बांगलादेशी क्रिकेटपटू..

गोळीबारीची घटना स्थानिक वेळेनुसार, शुक्रवारी दुपारी 1 वाजून 45 मिन‍िटांला झाली. बांगलादेश क्रिकेट संघातील काही क्रिकेटपटू यावेळी कोचिंग स्टाफसोबत नमाज पठणासाठी अल-नूर मशिदीत केले होते. एसपीईएनचे बांगलादेशाचे करस्पॉन्डेंट मोहम्मद इस्लाम हे देखील क्रिकेटपटूंसोबत होते. इस्लाम यांनी सांगितले की, क्रिकेटपटू बसमधून उतरत होते तितक्यात मशिदीतून गोळीबाराचा आवाज आला. मशिदीतून अनेक लोक बाहेर धावतच आले. काही जणांनी तर बाहेर आल्यानंतर प्राण सोडले. 10 मिनिटांत क्रिकेटपटू हॉटेलमध्ये निघून आले.

 

शाळा, कार्यालये बंद..
या घटनेच्या पार्श्यभूमीवर पोलिस आयुक्त माइक बुश यांनी क्राइस्टचर्च शहरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ऑफिस, लायब्ररी देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील नागरिकांना पुढील सुचना मिळेपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...