आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वेलिंग्टन - दहशतवादाविरोधात न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंदा अर्दर्न यांनी मोहीम उघडली आहे. सोमवारी त्यांनी याबाबत घोषणा केली. यानुसार आतंवादाचा ऑनलाइन प्रसार रोखण्यासाठी १७ जणांचे विशेष पथक नेमण्यात येणार आहे. तसेच यावर सुमारे १२१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याआधी चार वर्षांत न्यूझीलंड सरकारने ७८ कोटी रुपये खर्च केले आहेत.
या वर्षी गेल्या मार्च महिन्यात एका कथित श्वेत वर्चस्ववाद्याने ख्राईस्टचर्चमध्ये दोन मशिदींवर अशाच हिंसक साहित्याने प्रेरित होत नरसंहार केला होता. दोन मशिदींवरील हल्ल्यात ५१ जणांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोराने फेसबुकवर या घटनेचे प्रसारणही केले होते. तसेच याबाबतचे व्हिडिओ ट्विटर, यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर टाकले होते. जसिंदा अर्दर्न यांनी सांगितले की, अतिरेकी आणि हिंसक कट्टरपंथी मजकूर त्वरीत शोधण्यासाठी आणि त्याचा प्रसार राेखण्यासाठी न्यूझीलंडची क्षमता वाढावी यासाठी जास्त निधी दिला जात आहे. त्या म्हणाल्या की, या निधीतून गृह मंत्रालयाची फॉरेन्सिक, इंटेलिजेन्सीचा तपास करणे आणि त्याला रोखण्याची क्षमता दुप्पट होईल. हे पथक ऑनलाइन प्रसारीत होणारा हिंसक कट्टरपंथी मजकूर थांबवेल.
जसिंदा यांनी सांगितले की, यात सहभागी लोकांचा चौकशी करण्यासाठी आणि त्यांच्यावर खटला दाखल करण्याचे अधिकार या पथकाला देण्यात आले आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत भागीदारांसोबत काम करतील.
अर्दर्न यांच्या ख्राइस्टचर्च काॅल मोहिमेअंतर्गत पथकाची स्थापना
जर्मनीत अशाच प्रकारची घटना नुकतीच घडली, यामुळे जसिंदा अर्दर्न यांची ही घोषण महत्त्वाची मानली जात आहे. या हल्ल्यात हल्लेखोराने हेल्मेटमध्ये कॅमेरा लावला होता. त्याने जर्मनीत यहुदींच्या धर्मस्थळावरील लोकांवरील हल्ल्याचे प्रसारण केले होते. अर्दर्न यांनी न्यूझीलंडवरील आतंकवादी हल्ल्यांनंतर ख्राइस्टचर्च कॉल मोहीम सुरू केली होती. जगातील दिग्गज नेत्यांनी आणि सिलिकॉन व्हॅलीतील टेक दिग्गजांनीही त्याचे समर्थन केले होते. या मोहिमेचा उदेश हिंसक व अतिरेकी विचार पसरवणाऱ्या मजकुराला रोखण्यासाठी टेक कंपन्या आणि मीडिया आउटलेटसाठी मानक तयार करणे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.