आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, ५ जणांचा मृत्यू, ११०० बेपत्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मदतीसाठी सात हेलिकॉप्टर रवाना, मात्र केवळ एकच उतरू शकले, १८ जणांना वाचवले

वेलिंग्टन- न्यूझीलंडच्या व्हाइट आयलंडमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने ५ जणांचा मृत्यू झाला. तर १००० पर्यटकांसह ११०० जण परिसरात अडकले होते. ज्वालामुखीमुळे तापमान वाढल्याने नदीतील पाण्याचा प्रवाहाची गती वाढली. पूरस्थितीमुळे पर्यटक अडकले. या लोकांपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. यातील केवळ १८ जणांना वाचवता आले आहे. हे लोकही गंभीररीत्या भाजले आहेत. अंधारामुळे लोकांना शोधता येत नव्हते. मदतीसाठी सात हेलिकॉप्टर पाठवण्यात आले होते. मात्र, यातील केवळ एकच उतरू शकले. अिधकाऱ्यांच्या माहितीनुसार ज्वालामुखीतून  पांढरी राख आणि दगड १२ हजार फुटांपर्यंत उडताना दिसून आले. हा मध्यम प्रकारचा ज्वालामुखी उद्रेक आहे. घटनेच्या काही क्षण आधी पर्यटकांचा एक गट ज्वालामुखीच्या मुखाकडे जाताना दिसून आला होता. याच गटाने ज्वालामुखीच्या उद्रेकाची छायाचित्रे घेतली.न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाचे नागरिक फसले :  न्यूझीलंड क्रूझ असोसिएशनच्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाचे ३० पर्यटक क्रूझने ज्वालामुखीकडे गेले होते. हे क्रूझ गेल्या आठवड्यात सिडनीहून १२ दिवसांच्या प्रवासावर निघाले होते. उद्रेकाच्या आधी चार लोकांना घेऊन एक हेलिकॉप्टर उतरले होते. त्यांचा शोध घेतला जात आहे.

तंत्र : रोज हालचालींची नोंद व्हायची, तरीही अपघात घडला
 
ज्वालामुखी विभाग आधीपासून रोज मध्यम तीव्रतेच्या ज्वालामुखीच्या हालचालींची नोंद करत होता. त्यांनी ज्वालामुखीच्या उद्रेकाचा इशारा दिला होता. तरीही या ठिकाणी पर्यटक येत होते. गेल्या महिन्यात ज्वालामुखीची सतर्कता पातळी वाढवून २ करण्यात आली होती. मात्र, लोकांना जाण्यापासून रोखण्यात आले नाही. बोट टूरने रोज शेकडो पर्यटक येत होते. व्हाइट आयलंड आधीपासूनच ज्वालामुखीच्या दृष्टीने धोकादायक आहे.

पुढे काय: पुढील २४ तास धोक्याचे, ज्वालामुखीच्या उद्रेकाची भीती
 
विभागाने पुढील २४ तासात पुन्हा उद्रेकाची भीती व्यक्त केली आहे. ज्वालामुखीच्या जवळ न जाण्याचे लोकांना सांगितले आहे. दरवर्षी येथे १० हजार पर्यटक येतात.


हा ज्वालामुखी ८०% जमिनीच्या आत आहे. त्याचे केवळ तोंड दिसते. येथे ५० वर्षांपासून उद्रेक होत आहेत. शेवटच्या वेळी २००१ मध्ये येथे ज्वालामुखीतून आग निघाली होती. लहान- मोठ्या हालचाली वर्षभर सुरू असतात.