आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडचा सिडनीत सहावा पराभव; ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांनंतर विजयी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेक्षक नसल्याने खेळाडूंना स्वतःहून चेंडू शोधावा लागला - Divya Marathi
प्रेक्षक नसल्याने खेळाडूंना स्वतःहून चेंडू शोधावा लागला
  • कोरोना व्हायरसमुळे चाहत्यांविना सलामीचा सामना रंगला
  • ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी; न्यूझीलंडवर ७१ धावांनी मात

सिडनी - यजमान ऑस्ट्रेलियाने आपल्या घरच्या मैदानावर शुक्रवारी विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने सलामीच्या वनडे सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडचा पराभव केला. यजमान ऑस्ट्रेलियाने ७१ धावांनी सामना जिंकला. यासह ऑस्ट्रेलियाच्या संघाने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. ऑस्ट्रेलिया संघाला सिडनीच्या मैदानावरील सलग पराभवाची मालिका खंडित करता आली. पाच पराभवांतून सावरलेल्या ऑस्ट्रेलियाने या मैदानावर विजयाचे खाते उघडले. तसेच न्यूझीलंडचा संघ १८ वर्षांत सिडनीच्या मैदानावर विजयी पताका फडकवू शकला नाही. टीमचा या मैदानावर हा सलग सहावा पराभव ठरला. ऑस्ट्रेलियाने २५९ धावांचे टार्गेट दिले हाेते. न्यूझीलंडने १८७ धावांवर आपला गाशा गुंडाळला.

न्यूझीलंडची निराशादायी खेळी 

खडतर लक्ष्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाची निराशादायक सुरुवात झाली. टीमने पहिल्या दहा षटकांत २८ धावा काढताना एक विकेट गमावली. त्यानंतर ९६ धावा असताना पाच बळी गेले. ४१ षटकांत किवींचा संघ पॅव्हिलियनमध्ये परतला. दरम्यान, लाॅथम (३८) आणि ग्रँडहाेमेने (२५) सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.