Home | Sports | From The Field | new zeland former captain martin crow play in club cricket

मार्टिन क्रो अठ्ठेचाळीसाव्या वर्षी क्‍लब क्रिकेट खेळणार

Agency | Update - May 23, 2011, 03:34 PM IST

न्यूझीलंडचा माजी कर्णधार मार्टिन क्रो वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी प्रथमश्रेणी क्रिकेटसाठी पुनरागमनाचा विचारात आहे.

  • new zeland former captain martin crow play in club cricket

    ऑकलंड - न्यूझीलंडचा माजी कर्णधार मार्टिन क्रो वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी प्रथमश्रेणी क्रिकेटसाठी पुनरागमनाचा विचारात आहे. स्वयंप्रेरणा मिळावी, तंदुरुस्त राहता यावे आणि प्रथमश्रेणीतील वीस हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या 392 धावा करणे असे त्याचे उद्देश आहेत. त्याच्या निवृत्तीला 15 वर्षे उलटली आहेत.

    मार्टिन क्रो आधी कॉर्नवॉल क्‍लबकडून खेळणार आहे. त्यानंतर तो ऑकलंड सेंट्रल डिस्ट्रिक्‍ट्‌सकडून खेळण्याचा निर्णय घेईल. मार्टिन क्रो याने सांगितले की, तुम्ही सतत भरकटत असल्याचे दिसून येते. माझे वय लक्षात घेतल्यास व्यायामाची जास्त गरज आहे. तंदुरुस्त राहणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे. मला पोहायला, सायकल चालवायला किंवा वजन उचलण्याचा सराव करायला आवडत नाही. मी गिर्यारोहण करू शकत नाही. मी धावू शकत नाही. असे असताना मग तंदुरुस्तीसाठी क्रिकेट खेळण्यास काय हरकत आहे? माझ्या खेळण्यामागे थोडी मजा करण्याचा उद्देश आहे, पण तंदुरुस्तीकडे मी गांभीर्याने बघत आहे.

    गांगुली खेळू शकत असेल, तर मी का नाही? असे तो गमतीने म्हणाला. शेन वॉर्न, ऍडम गिलख्रिस्ट अशा खेळाडूंनी अजूनही तंदुरुस्ती राखली असल्याचे त्याने नमूद केले.

Trending