आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळाला दूध पाजताना झाली मोठी चूक, जन्माच्या दुसऱ्याच दिवशी गमावले बाळ, दाईचा सल्ला पडला महागात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉल्टन - इंग्लंडच्या एका रुग्णालयात गेल्यावर्षी एका दुर्दैवी घटनेमध्ये आईचे दूध पिताना एका नवजात बाळाचा मृत्यू झाला होता. बाळाची आई प्रचंड थकलेली होती. बाळाला दूध पाजताना तिला झोप लागली. त्याचवेळी बाळ तिच्या शरिराखाली दबले गेले आणि श्वास गुदमरून त्या बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर आईने हॉस्पिटलवर बेजबाबदार पणाचा आरोप करत खटला दाखल केला. 


बाळाच्या जन्माचा आनंद फक्त एक दिवस 
- हे प्रकरण गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यातील आहे. एन ब्रेडली हि पहिल्याच डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. 26 तारखेला तिने एका बाळाला जन्म दिला. त्याचे नाव लुई फ्रान्सिस ठेवण्यात आले. बाळाच्या जन्माने सगळेच प्रचंड आनंदात होते. 
- पण ब्रेडलीचा हा आनंद फक्त एकच दिवस टिकला. कारण दुसऱ्याच दिवशी दूध पाजताना झालेल्या चुकीमुफे तिच्या बाळाचा मृत्यू झाला. 
- तिने सांगितले की, 'डिलिव्हरीतील लेबर पेनमुळे ती प्रचंड थकलेली होती. मी पहिल्यादाच आई बनले होते. त्यामुळे मला बाळाला कुशीत घेऊन दूध पाजणे कठीण जात होते. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या केअरटेकर (दाई) ने मला बाळाच्या बाजुला झोपून दूध पाजण्याचा सल्ला दिला. मी तसेच केले. 
- मी फार थकले होते आणि बाळाला पाजता पाजता तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी जेव्हा ब्रेडली झोपेतून उठली तेव्हा सकाळी तिने पाहिले तेव्हा बाळाचा मृत्यू झाला होता. दूध पाजताना तिच्या शरिराखाली दबून बाळाचा श्वास गुदमरला होता. 

 

कोर्टानेही व्यक्त केले आश्चर्य 
- याबाबत सल्ला देणाऱ्या दाईने सांगितले की, मी या धोक्याबाबत तिला सांगितले होते. पण असे काही होईल असे मला वाटले नाही. स्पष्टीकरण देताना दाईने मुलाला अंथरुणात झोपवताना लक्षात ठेवण्याचे दिशा निर्देशही पुरावा म्हणून सादर केले. पण कोर्टाने ते विरोधाभासी असल्याचे सांगितले. 
- कोर्टाने बराच वेळ लेबर पेन नंतर थकलेल्या आणि प्रथमच आई बनलेल्या महिलेला बाळाबरोबर एकटं सोडण्याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच हॉस्पिटलकडून याबाबत उत्तरही मागितले आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...