आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हात आणि पायाला 6 बोटे घेऊन जन्माला आली मुलगी, आईने कापली बोटे, महिलेने सांगितले यामागचे सत्य...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडवा(मध्यप्ररदेश)- हाताला आणि पायाला 6 बोटे घेऊन जन्माला आलेल्या एका मुलीचा तिच्याच आईने जीव घेतला आहे. 6 बोटांना अशुभ माणुन आईने तिच्या हाता-पायातील एक-एक बोट कापले. त्यानंतर त्याठिकाणी इन्फेक्शन झाले आणि नवजात मुलीने 6 तासातच जीव सोडला. घटनेची माहिती आरोग्य विभागाला दोन दिवसांनंतर कळाली, बीएमओने तत्काळ प्रसुती घरात जाऊन पंचनामा केला आणि घटनेस जबाबदार व्यक्तींना नोटिस जारी केली.


घटना आदिवासी ब्लॉक खालवाच्या सुंदरदेव गावातील आहे. गावातील रामदेव यांच्या पत्नीने शनिवारी रात्री एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या हात आणि पायाला सहा-सहा बोटे पाहून काहीतरी अशुभ होणार असे बाळाच्या आईला वाटले. त्यानंतर तिने कोणलाही काही न सांगता धारदार शस्त्राने बाळाची बोटे कापली. रामदेवने प्रसुतीची सुचना गावातील आशा कार्यकर्त्यालाही दिली नाही. दुसऱ्या दिवशी इन्फेक्शनमुळे बाळाचा जीव गेला. या घटनेची माहिती बीएमओ पर्यंत गेली आणि त्यांनी कारवाई केली. बाळाच्या आईने बोटे कापल्याचे स्वीकार केले, त्यानंतर बीएमओने सुपरवायझर, एएनएम, आशा कार्यकर्ता आणि त्यांच्या साथिदारांना नोटिस जारी केली.


अंधश्रद्धेमुळे रूग्णालयात प्रसुती करत नाहीत गावातील लोक
खालवा ब्लॉकचे अनेक गाव जंगलात राहतात. येथे मोबाईल नेटवर्कदेखील येत नाही, त्यामुळे लोक रूग्णवाहिकेला बोलवु शकत नाहीत. त्यासोबतच अंधश्रद्धेमुळे रूग्णालयातदेखील जात नाहीत येथील अदिवासी. 

 

घटनास्थळी जाऊन आधिकाऱ्यांना माहिती देली आहे
मला घटनेची माहिती मिळताच मी सुंदरदेव गावात गेले. वरिष्ठ आधिकाऱ्यांनाही माहिती दिली. सोमवारी प्रसुती झाली होती. मुलीच्या आईने जास्तीची बोटे कापली आणि त्यामुळेच इंफेक्शन झाले आणि बाळाचा मृत्यु झाला. आम्ही पंचनामा केला असून संबधित लोकांवर कारवाई केली आहे.
-डॉ. शैलेंद्र कटारिया, बीएमओ खालवा

बातम्या आणखी आहेत...