आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Newly Adopted Kitten Begins Changing Rapidly Before Her Family Uncovers A Bewildering Twist

घरात पाळीव म्हणून आणले मांजरीचे नवीन पिल्लू, हळू-हळू होणारे बदल पाहून धक्काच बसला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - रशियातील एका कुटुंबाने घरात पाळण्यासाठी एक मांजरीचे पिल्लू आणले. हे पिल्लू अतिशय सुंदर आणि गुबगुबीत होते. परंतु, काही दिवसांतच त्यामध्ये होणारे बदल पाहून सगळेच हैराण झाले. सुरुवातीला त्या मांजरीचे सर्व केस गळाले. यानंतर क्यूट आणि शांत दिसणाऱ्या मांजरीच्या वर्तनातही बदल होण्यास सुरुवात झाली. तरीही कुटुंबियांचे त्या प्राण्यावरील प्रेम कमी झाले नाही. 


इतके क्यूट होते की घरात आणले
ही स्टोरी रशियात राहणाऱ्या एका कुटुंबाची आहे. शाळेत जाणारी त्यांची मुलगी दाशा एक दिवस अचानक घरात मांजरीचे पिल्लू घेऊन आली. कुटुंबियांनी तिचे नाव सिमीना ठेवले आणि काळजी घेण्यास सुरुवात केली. सिमीना इतकी क्यूट होती की पाहताच कुणीही तिला हात लावल्याशिवाय राहू शकत नव्हते. तिच्या अंगावर एखाद्या सशाप्रमाणे भरपूर केस होते. तिच्या क्यूटनेसवरच फिदा होऊन कुटुंबाने तिला घरात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अचानक तिच्यात बदल होण्यास सुरुवात झाली. 


केस गळाले, हिंसक बनली मांजर
काही महिन्यातच सिमीनाच्या शरीरावरील केस गळण्यास सुरुवात झाली. लवकरच तिच्या अंगावर एक केसही राहिला नाही. तिची गुलाबी स्किन स्पष्ट दिसत होती. एकेकाळी गुब-गुबीत दिसणारी मांजर आता कुरूप झाली होती. हा बदल तिच्या शरीरावरच नव्हे, तर वर्तनातही दिसून आला. नेहमीच शांत राहणारी सिमीना आता अचानक कुणावरही हल्ले करण्यास तयार होती. ती हिंसक बनली होती. या मांजरीला मिठाई आणि चॉकलेटचे व्यसन लागले होते. कुठल्याही मांजरीला असले पदार्थ आवडत नाहीत. घरात येणारे पाहुणे तिची मस्करी करत होते. या मांजरीला कोणता आजार झाला. किंवा अणुप्रकल्पातील अपघातग्रस्त आहे का अशी विचारणा लोक करायचे.


तरीही कुटुंबियांनी दिले भरपूर प्रेम
गेल्या 4 वर्षांपासून ही मांजर त्या कुटुंबियांच्या घरात आहे. सुरुवातीला आपल्याला कुणी तरी वेड्यात काढून वाइट मांजर दिली असे दाशाला वाटायचे. परंतु, कालांतराने तिची जवळिक इतकी वाढली की कशीही असो तिला अशाच अवस्थेत स्वीकारणार असा ठाम निश्चय दाशाने घेतला. या दरम्यान दाशा किंवा कुटुंबियांनी मांजरीसोबत कधीच वाइट वर्तन केले नाही. तिला तितकेच प्रेम दिले जितके तिच्यावर सुंदर असताना कुटुंबातील प्रत्येक सदस्य करत होता. उलट कुरूप झाल्यानंतर दाशा आपल्या मांजरीची अतिरिक्त काळजी घ्यायला लागली. ती दिवसातून दोनदा सिमीनाला स्वच्छ करते. तिच्या डोळ्यातील घाण साफ करते. ती आजही दाशासाठी जगातील सर्वात सुंदर मांजर आहे.

 

बातम्या आणखी आहेत...